उरण: सुनिल ठाकूर
उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी साहेब, मित्र मंडळ व भाजपा व्यापारी सेल असो सिएन उरण यांच्या विद्यमाने भारताचे कर्तबगार पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब यांच्या 75 वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल चिपळे येथील आदिवासी, कर्णबधीर, मतिमंद निवासी विद्यालया तील 29 दिव्यांग मुलांना सह शिक्षकां सह पनवेल ते गोवा असा विमान प्रवास घडवीला. यासाठी हितेश शहा, हस्तीमल मेहता, अजित भिंडे, भावेश शहा, हरेश भिंडे, आनंद ठक्कर, चेतन ठक्कर, दीपक दळी, अभिषेक जैन हे या सहलीचे आयोजक होते. त्यांच्या समवेत शाळेचे शिक्षक मनोज कुरुलकर हेमंत, साधना शेट्ये, अनुष्का पावसे इत्यादी नी या सहलीचा आनंद लुटला.
दिव्यांगाना विमान प्रवास करण्याचा सुखद आनंद मिळाल्याने दिव्यांग्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आल्याने त्यांनी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या संदेशातून शुभेच्छा दिल्या.आणि आयोजक यांनी हवाई सहल घडविल्या बद्दल आयोजकांचे आभार मानले.