-->
आपला महाराष्ट्र 24

शिवसेना शाखा प्रमुख श्री सुभाष तांडेल यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न*.

उरण: सुनिल ठाकूर
उरण तालुक्यातील महालण विभागातील जसखार गावातील  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे डॅशिंग नेतृत्व श्री सुभाष तांडेल यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला .हिंदू ह्रदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या दिलेल्या शिकवणीप्रमाणे ८०% समाजकारण २०% राजकारण उक्ती प्रमाणे जसखार गावातील ग्रामस्थांना सुख दुःखात अडचणी काळात मदत करणारे श्री सुभाष तांडेल हे नेहमीच अग्रेसर असतात. सद्य परिस्थितीत जसखार गावाला लाभलेले नवनेतृत्व म्हणून जेष्ठ नागरिक,महिला वर्ग व तरुणांमध्ये श्री सुभाष तांडेल यांनी स्वतःची ओळख तयार केलेली आहे. व सर्व ग्रामस्था मध्ये जसखार गावला न्याय हक्क मिळविण्यासाठी नवी उमेद तयार केली आहे.सदर वाढदिवसा प्रसंगी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख श्री अमित ठाकूर,राष्ट्रवादी चे विभाग अध्यक्ष श्री संजय तांडेल,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री प्रमोद म्हात्रे शिवसेना वाहतूक सेनेचे उप तालुका प्रमुख श्री संतोष पाटील,प्रकल्पग्रस्त गाव कमिटी चे अध्यक्ष श्री रोशन भोईर,भाजपा युवा अध्यक्ष श्री अमिर ठाकूर, श्री महेश ठाकूर बूथ अध्यक्ष भाजपा, श्री नरेश घरत ग्रामसुधारणा कमिटी सदस्य आदि उपस्थित होते.सर्वांकडून श्री सुभाष तांडेल यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.