-->
आपला महाराष्ट्र 24

वीर वाजेकर महाविद्यालयात"आंतरराष्ट्रीय योग दिन "संपन्न.

फुंडे-दिनांक-२१ जून,२०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग व सहज योग संस्था यांच्या संयुक्त विध्यमाने एक आठवड्याचे योग शिबीर आयोजित करण्यात आले आहे.२१ जून रोजी योग दिनाचे औचित्य साधून उद्घाटन करण्यात आले.हेमंत पाटील यांनी योग विद्या म्हणजे काय,योगाचे महत्त्व शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगितले. मुकेश बागीते(योग प्रशिक्षक,सहज योग संस्था)यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांना योगासने व प्राणायाम यांचे प्रकार शिकवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख,डॉ.संदिप घोडके,को-ओरडीनेटर यांनी केले.प्राचार्य,डॉ.प्रल्हाद पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत गोतपागर,(कार्यक्रम अधिकारी,रा.से.योजना )यांनी केले.प्रा.संतोष देसाई यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.राष्ट्रीय सेवा योजनेचे तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे व महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.