उरण (सुनिल ठाकूर ).
मा.श्रीमती उज्वला बाणखेले मॅडम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रायगड,मा. श्री. नितीन फुलसुंदर साहेब उपविभागीय कृषि अधिकारी खोपोली व मा. अर्चना सुळ-नारनवर मॅडम तालुका कृषी अधिकारी उरण यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हास्तरीय रान भाजी महोत्सव 2023-24 तालुका उरण येथे १) तेरा पंथ हॉल उरण २) महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा उरण ३) श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल उरण ४) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह चानजे उरण या चार ठिकाणी मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय श्रीमती उज्वलाजी बाणखेले मॅडम उपविभागीय कृषी अधिकारी माननीय फुलसुंदर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास उरण,खालापूर,कर्जत, पेण,अलिबाग, मुरुड तालुक्यातील शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात रानभाज्या आणल्या होत्या. कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर उरण तालुक्यातील शेतकरी,मा. अर्चना सुळ नारनवर मॅडम तालुका कृषी अधिकारी उरण, श्री निंबाळकर साहेब तालुका कृषी अधिकारी खालापूर,श्री.गायकवाड साहेब तालुका कृषी अधिकारी कर्जत तसेच उरण,खालापूर,कर्जत, पेण,अलिबाग, मुरुड तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.