-->
आपला महाराष्ट्र 24

शेतीचे नुकसान व घरात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या-मनसेची तहसीलदारां कडे मागणी

उरण (सुनिल ठाकूर ) : सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल तालुक्यातील शेतीचे नुकसान व घरात पाणी शिरल्याने शेतक-यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका पदाधिका-यांनी तहसिदार विजय पाटील यांची भेट घेऊन शेतक- यांना नुकसान भरपाई मिळावी याबाबतचे निवेदन देण्यात आले. 
यावेळी तालुकाध्यक्ष रामदास पाटील, तालुका सचिव अमोल पाटील, तालुका उपाध्यक्ष चिंतामणी मुंगाजी,भातान शाखाध्यक्ष विजय ठाकूर, खानावळे शाखाध्यक्ष आकाश पाटील, जड अवजड वाहतूक सेना जिल्हा संघटक विजय जाधव, सुकापूर शाखाध्यक्ष जयवंत बाबरे, नितळस शाखाध्यक्ष नितेश पाटील, प्रवीण पाटील, संतोष गायकवाडी, सोनी बेबी आदी पदाधिका-यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.