उरण: सुनिल ठाकूर
*नवी मुंबईतील सुप्रसिद्ध आणि सुपरिचित असं " करावे गाव " आणि या आपल्या गावातील सर्वश्रुत असा " श्री गणेश तलाव " आणि विसर्जन घाटापासुन जवळपासच असलेले " मास्तर शेफ भोजनालय आणि उपहारगृह " यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते आणि दिसून येते......ते म्हणजे निस्सीम, निर्लोभ असं ........'औदार्य '(दांतव्य).......*
*स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर या खानावळ केंद्राचे, या भोजनालयाचे मालक आणि जे सिरीजचे मालक.....श्री. जितेश विजय म्हात्रे हे गेल्या कित्येक वर्षांपासून अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने श्रींच्या मूर्तीला, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येणा-यांना तसेच त्या प्रसंगी उपस्थित समस्त श्री गणेश भक्तांना निःशुल्क आणि नियोजनबद्ध अल्पोपहाराची (वडापावची) सेवा देतांना दिसतात....*
त्यांच्या या सेवे बद्दल
कोट :
*ते म्हणतात ना की , देण्याची कुवत / क्षमता.... असण्यापेक्षा देण्याची दानत /प्रबळ ईच्छा असणे गरजेचे आहे, ती असली की सगळं काही सुरळीत होतं, तो आहे ना " आपला बाप्पा " तो घेतो सगळं करून, अगदी व्यवस्थित... -जितेश विजय म्हात्रे -