उरण:सुनिल ठाकूर
नवी मुंबई येथील कलासाधना सामाजिक संस्था, यांच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रस्तरीय प. पू. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार, समाजभुषण पुरस्कार, व जीवन गौरव पुरस्कार व राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात रविवार दि.०७ सप्टेंबर २०२५ रोजी कराडी समाज हॉल, कामोठे, नवी मुंबई येथे मुख्य अतिथी व शुभहस्ते मा. श्री. अच्युत पालव
पद्मश्री (भारत सरकार२०२५) सुप्रसिद्ध जेष्ठ आंतरराष्ट्रीय सुलेखनकार,प्रमुख पाहुणे म्हणून
दिगंबर तायडे पद्मश्री पुरस्कार ( नामांकन २०२६) दानशूर व्यक्तिमत्व, कॅप्टन मनोज भामरे
माजी लष्करी अधिकारी (भारतीय लष्करातील शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड अधिकारी)रामजीत (जितू)गुप्ता
(मुख्य तपास अधिकारी, अँटी पायऱसी सेल मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराम महाजन यांनी केले. सुलेखन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अच्युत पालव यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अनघा जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर देवकर यांनी केले.
या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून ८३०अर्ज प्राप्त झाले होते, त्यातून ५०विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती, पुरस्कार स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, आकर्षक मेडल श्यामची आई पुस्तक. नॅपकिन बुके देऊन सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला. पुढील मान्यवरांच्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. *प. पू. साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार*
उल्हास देशमुख, शारदा राणा, राजेंद्र जावळे, फुंदे शरदराव रघुनाथ
*प. पू. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार*
उषा सिंह, गोरे मनेश बब्रुवान, कृष्णा पाटील, आसिया परविन अब्दुल रहमान, राकेश महाजन, सुरेश जाधव, अर्चना मारकड, महेश जाधव, साधना कोपनर, राजन राठोड, जयसिंग बेटकर, विठ्ठल म. मणूरे,
सुनील म्हात्रे. पुनम देसाई,
मानसी चव्हाण, सिताराम प्रभु, धनाजी थिटे, किरण सरोदे, ऋता भामरे, नुरी गुलाम मोहम्मद मुस्तफा, मंदार चोरगे, के. परमेश्वर, नितीन मोहरीर, स्मिता प्रल्हाद जोशी, संतोष साखरे, श्रद्धा बनसोडे, चंद्रशेखर साळवे, नरेश लोहार, सुरेश वाघमारे, नॅन्सी मुथु स्वामी, काजल सुर्वे, विश्वनाथ पाचाळ, विजय वाघेला, वर्षा डाभी, वैशाली शेलार
*प. पू. साने गुरुजी समाज भूषण पुरस्कार*
अजय जिरापुरे, विलास खंडेराव समेळ, गोरखनाथ पोळ,
अनिल पाटील, संध्या भांगरे, सत्यवती खळदकर, रवींद्र माहिमकर, सुनिल ठाकूर (पत्रकार उरण), विपीन राऊत, सुमन देसाई, दिलीप मोकल, अनंत देवघरकर,
अमित कांबळे, राजेंद्र गवळी, परशुराम घाडगे, बिजक्षी राय,
*राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेचे विजयी स्पर्धक*
नरेंद्र हिरामण भुसारे, सुनिल प्रकाश भोसले, घनश्याम प्रकाश बोरसे /चित्रसेन वासुदेव पागधरे
या पुरस्कारसाठी ज्ञानेश्वर देवकर, जितेंद्र अहिरराव, समाधान रोकडे, प्रदीप महाजन, श्रीराम महाजन यांनी खूप मेहनत घेऊन पुरस्कार सोहळा यशस्वी केला.