-->
आपला महाराष्ट्र 24

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उरण तालुका ( ग्रामिण ) च्या अध्यक्ष पदी श्री. शैलेश शरद गावंड यांची नियुक्ती.

उरण:सुनिल ठाकूर         
उरण द्रोणागिरी नोड येथील भारतीय जनता पार्टी च्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटण सोहळा तसेच नविन पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी द्रोणागिरी नोड येथे पनवेल चे विद्यमान आमदार प्रशांत दादा ठाकुर साहेब , उरणचे विद्यमान आमदार महेशशेठ बालदी साहेब , उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी , भाजपा चे नेते प्रितमशेठ म्हात्रे , भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य रविशेठ भोईर , जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत शेठ घरत , भाजपा उरण ग्रामिण मंडळ अध्यक्ष धनेश गावंड , भाजपा उरण शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर , भाजपा पनवेल मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाल आदी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला या सोहळ्यात भारतीय जनता पार्टी च्या ग्रामिण मंडळ व शहर मंडळ कार्यकारिणी ची नव्याने नियुक्ती करण्यात आली यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उरण ( ग्रामिण ) च्या अध्यक्ष पदी श्री शैलेश शरद गावंड यांची नियुक्ती करण्यात आली , नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असुन संपुर्ण भारतीय जनता पार्टी मध्ये उत्साहाचे वातावरण दिसुन येत आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.