पनवेल करंजाडे या ठिकाणी खड्ड्यांची मोठी समस्या आहे.महाविकास आघाडी च्या वतीने भजनी आंदोलन करण्यात आले. यामध्ये टाळ वाजून ज्ञानोबा तुकाराम सिडको विनाकाम,हे पांडुरंगा... विठ्ठला करंजाडे खड्डे मुक्त करण्याची सदबुध्दी दे सिडकोला असा जयघोष करण्यात आला.पावसाळा आला तरी ह्या रस्त्याची अजून कामे झाली नाही आहेत.रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न नागरिकांना समोर उभा राहिला आहे.या आंदोलना दरम्यान NCP करंजाडे शहर अध्यक्ष रंजित नरुडे,माजी सरपंच रामेश्वर आग्रे,करंजाडे शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गौरव गायकवाड व करंजाडे मधील नागरिक उपस्थित होते.
करंजाडे येथील नागरिकांनी सिडको विरोधात रस्त्यावर उतरून केले आंदोलन.
byमुख्य संपादक - सुनील ठाकूर
•