-->
आपला महाराष्ट्र 24

.महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते दसऱ्याला क्रिकेट पर्वाचा शुभारंभ!


उरण: सुनिल ठाकूर
सिनीयर क्रिकेट क्लब पनवेल आणि अर्ली मार्निंग क्लब, चिंचपाडा या संघांच्या क्रिकेट पर्वाचा शुभारंभ गुरुवारी दसऱ्याला आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि सिनीयर क्रिकेट क्लब, पनवेलचे कर्णधार महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते झाला. यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन करून क्रिकेट पर्वाचा आनंद घेतला.  
प्रत्येक शनिवारी आणि रविवारी बहुतांश वेळा महेंद्रशेठ पनवेल महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी आठला क्रिकेट खेळण्यासाठी हजर असतात. अपवाद असतो ते विदेशात दौऱ्यावर असल्यास. काटेकोर वेळेचे व्यवस्थापन करण्यात महेंद्रशेठ घरत यांचा हातखंडा आहे. म्हणूनच ते आज अनेक क्षेत्रांत लीलया वावरू शकतात. 
चौकट...
राजकारणातला राजहंस!
माणसाचा आहार-विहार कसा आहे, त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. महेंद्रशेठ घरत हे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष असले तरी क्रिकेट, वाचन, लेखन, ट्रेकिंग, गायनाची त्यांना प्रचंड आवड आहे. वेळात वेळ काढून ते हे सर्व छंद जोपासतात. म्हणूनच ते हजरजबाबीही आहेत. म्हणूनच त्यांना राजकारणातील राजहंस म्हणतात.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.