-->
आपला महाराष्ट्र 24

डब्ल्यूएनएसतर्फे ठाण्यात अत्याधुनिक ग्लोबल ऑपरेशन्स हबची सुरुवात.


उरण:सुनिल ठाकूर 
 डब्ल्यूएनएस (होल्डिंग्ज) लिमिटेड या डिजिटल आधारीत बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन आणि सेवा कंपनी तर्फे आज त्यांच्या नवीन ५००० सीट्स ने युक्त अशा नवीन विशाल ग्लोबल ऑपरेशन्स हबच्या उद्घाटनाची घोषणा केली. या संरचनात्मक सुरुवाती मुळे आता डब्ल्यूएनएस’ ठाणे/मुंबईतील कार्य एकाच ठिकाणाहून, अत्याधुनिक अशा केंद्रा तून होणार असल्याने कंपनीच्या नाविन्य आणि कर्मचार्‍यांच्या समृध्द अनुभव देण्याच्या वचनबध्दतेला चालना मिळणार आहे.
ठाण्याचे उपनगर असलेल्या हिरानंदानी बिझनेस पार्क येथे २,५५,५७८ चौरस फूटांवरील या केंद्रा मध्ये ५००० कर्मचारी बसू शकतील. अतिशय अचूक पणे डिझाईन केलेल्या या केंद्रामुळे डब्ल्यूएनएस च्या अत्याधुनिक, सर्वसमावेशक आणि शाश्वत वातावरण देण्याच्या वचनध्दतेला पोषक वातावरण प्राप्त होऊ शकेल, त्याच प्रमाणे नाविन्य, भागीदारी आणि कल्याणाला चालना मिळू शकेल.  डब्ल्यूएनएस’ ईएसजी वचनबध्दतेनुसार या केंद्रामध्ये उर्जा बचत करणार्‍या व्हीआरएफ सिस्टम्स, डे लाईट ऑप्टिमाईज्ड लेआऊट्स, बीफमा कॉम्प्लायन्ट वातावरण आणि व्हीओसीअढेसिव्ह्ज व पुर्नवापर करण्यात आलेल्या कार्पेट्स सारखे साहित्य या मध्ये वापरण्यात आले आहे. 

“हा कँपस केवळ कामाची जागा नव्हे तर भारताच्या अजोड क्षमतेवरील विश्वासाचे द्योतक असून यामुळे कामाच्या भवितव्याला आकार देऊन आमच्या लोकांना उर्जावान करत दीर्घकालीन मुल्य आम्ही आमच्या जगभरांतील ग्राहकांना यामुळे प्राप्त करुन देऊ शकू.” असे *डब्ल्यूएनएसचे ग्रुप सीईओ केशव आर मुरुगेश यांनी सांगितले.*

या ग्लोबल हबची वैशिष्ट्ये म्हणजे योग्य प्रमाणातील सूर्यप्रकाश, लवचिक असे कोलॅबरेशन झोन्स आणि विशेष वेलनेस रुम्स सह ६०० जण बसू शकतील इतका मोठा कॅफेटेरिया, इन्फोटेन्मेंट, विविध ब्रेकआऊट झोन्स, फोन बुथ्स आणि विशेष मनोरंजन क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. अत्याधुनिक अशा बीएमएस कमांड सेंटर आणि पर्यावरणस्नेही नोव्हेक १२३० गॅस फायर सस्पेन्शन सिस्टम या सर्व्हर रुम्स मध्ये बसवण्यात आल्याने डब्ल्यूएनएस’ सुरक्षा ही अधिक सक्षम बनली आहे. 

कामाची ही नवीन जागा कर्मचार्‍यांसाठी १८ सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने खुली करण्यात येत असून यामुळे हळूहळू सर्व टिम्स यामध्ये येऊ शकतील. डब्ल्यूएनएस ने विक्रोळी येथे १९९६ मध्ये सुरु करण्यात आलेले केंद्र सुरुच राहणार असून यामुळे त्यांची भविष्यातील वाढीची परंपरा अशी सुरु राहणार आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.