आज दिनांक १५/०९/२०२५ रोजी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आमदार श्री. रमेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लडाखचे नवनियुक्त उपराज्यपाल महामहिम श्री. कवींदरजी गुप्ता यांचा कोळी महासंघ व तमाम कोळी बांधवांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक करताना कोळी महासंघाचे सरचिटणीस श्री. राजहंस टपके यांनी रमेशदादा हे फक्त नेते नसून आपल्या समाजाचा विश्वास, ताकद आणि आपले प्रेरणास्थान असल्याचे म्हटले.
तसेच रमेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले. मच्छी विक्रेत्या महिलांना शीतपेटी वाटप, अधिकृत मासळी विक्री परवाने, मच्छीमार बांधवांना जाळ्या तसेच महिला भगिनींना साडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आदिवासी कोळी बांधव व मच्छिमार समाज बांधव तसेच रमेशदादा पाटील यांच्यावर प्रेम करणारे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर व कोळी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना रमेशदादा पाटील यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देण्याकरीता प्रचंड संख्येने आलेल्या सर्व समाज बांधवांचे व मान्यवरांचे आभार मानले. तसेच कोळी महासंघाच्या माध्यमातून आदिवासी कोळी व मच्छीमार बांधवांच्या प्रश्नासंदर्भात सुरू असलेल्या पाठपुराव्याची उपस्थित सर्व समाज बांधवांना माहिती दिली. तसेच समाजाच्या जातीच्या दाखल्या संदर्भात शासन स्तरावरून लवकरच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे कविंदरजी गुप्ता यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून जम्मू काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा अनुभव त्यांना असल्याने लडाखच्या विकासाकरीता त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला असल्याचे देखील सांगितले.
कविंदर गुप्ता यांनी रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कोळी महासंघाचे माध्यमातून समाजाच्या हिताची व अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे प्रचंड कामे करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कोळी समाजासाठी विविध निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार भाजपा मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतन पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास आमदार निरंजन डावखरे, कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, उपनेते देवानंद भोईर, मा.नगरसेवक तानाजी पाटील, निशिकांत पाटील, सदाशिव पाटील, शिवशंकर फुले, सतीश धडे, चंद्रकांत घोडके, अरुण लोणारी, लक्ष्मणभाऊ पापरकर, अभय पाटील, सुभाष कोळी, डी.एम. कोळी, बाळासाहेब सैंदाणे, मुकेशभाऊ सोनवणे, विकास सूर्यवंशी, रुक्मिणीताई अंबीगर, सुनीताताई माहुलकर व कोळी महासंघाचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.