उरण: सुनिल ठाकूर:-
दिनांक-२० सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना फुंडे कॉलेज व के.डी.एस.कॉलेज, यु.एस.महाविद्यालय सागर विचार मंच,
कंदळवन फाऊंडेशन सेल रायगड,नागरी संरक्षण सेवा दल उरण फ्रेंड्स ऑफ नेचर यांच्या संयुक्त विद्यमाने उरण येथील नागाव समुद्र किनारा स्वछता करण्यात आली.तीनही महाविद्यालयातून जवळजवळ 300 विद्यार्थी उपस्थित होते.नागरी सेवादल फ्रेंड्स ऑफ नेचर व इतर सामाजिक संस्थेचे 100 व्यक्ती कांदळवन संरक्षण दलाचे २५ जवान व साईश्वरी मॅडम, नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र गायकवाड, म्हातवली ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी उपस्थित राहून समुद्र किनारा स्वच्छता करण्यात आली. डॉ.आमोद ठक्कर प्रभारी प्राचार्य,वीर वाजेकर कॉलेज, फुंडे यांनी आपल्या मनोगतातून सागर आपल्या भविष्यातील पर्यावरण संवर्धनासाठी व भविष्यातील अन्न सुरक्षितता साठी कसे आवश्यक आहे ते वैज्ञानिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना , समजावून सांगितले शासनाच्या आदेशापेक्षा आपणच महिन्याच्या दर शनिवारी सागर किनारा स्वच्छता करुयात त्यात सर्वांनी सहभागी होऊया असे आवाहन केले . डॉ.दत्ता हिंगमिरे, विभागीय समनव्यक राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सागर विकास मंच ह्यांच्या मार्फत हात मोजे, मास्क व अल्पोपहार उपलब्ध करून दिला. म्हातवली ग्रामपंचायती कचरा संकलनासाठी निकेतन रमेश ठाकूर( फ्रेंड्स ऑफ नेचर सामाजिक संस्था, चिरनेर) यांचेही सहकार्य लाभले.प्रा.राम गोसावी,प्रा.बळीराम पवार कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना,फुंडे कॉलेज, महाविद्यालयातील सकाळ सत्रातील कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते.