-->
आपला महाराष्ट्र 24

महाराष्ट्र ऑलिंपिक’च्या विरोधात उपोषण खेळाडू, संघटक उतरणार मैदानात ः मतदानाचा अधिकार देण्याची मागणी

उरण:सुनिल ठाकूर
  महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनला ४७ ते ५० राज्य खेळ संघटना संलग्न आहेत.मात्र,काही खेळ संघटनांना महाराष्ट्र ऑलिंपिकच्या होणाऱ्या निवडणुकीला मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.बाकीच्या संघटनांना डावलण्यात आले आहे. यामुळे या संघटनांनी एकत्र येत मंगळवारी (ता.२३) उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळ संघटनांचे पदाधिकारी व राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू साखळी उपोषण करणार आहेत,अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली. 
ते म्हाणाले,महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशचे सरचिटणिस नामदेव शिरगावकर यांनी १५ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यकम जाहीर केला,तसेच या परिपत्रकासोबत निवडणुकीच्या मतदानास पात्र २२ खेळ संघटनाची यादी जाहीर केली.या अगोदर झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीत २७ खेळ संघटनांना मतदानाचे अधिकार देण्यात आलेले होते, तर आता होणाऱ्या निवडणुकीत कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, स्विमिंग व हॅण्डबॉल या पाच खेळांना वगळून फक्त २२ राज्य खेळ संघटनांना मतदानाचे अधिकार देण्यात आले आहेत.महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी संघटनेवर स्वतःचे वर्चस्व राहावे म्हणून जाणूनबुजून अनेक अधिकृत खेळ संघटनांना डावलल्याने महाराष्ट्रातील खेळांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. 
     महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनला ४७ ते ५० राज्य खेळ संघटना संलग्न आहेत.त्यामुळे या सर्व राज्य खेळ संघटनांना मतदानाचा अधिकार देणे क्रमप्राप्त असताना फक्त २२ राज्य खेळ संघटनांना निवडणुकीत मतदानाचे अधिकार देणे हा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांचा मनमानी कारभार आहे.सचिवांनी त्यांचा कार्यकाळात गोवा, गुजरात व उत्तराखंड येथे झालेल्या नॅशनल गेम्ससाठी शासनाकडून घेतलेल्या करोडो रुपयांच्या निधीचा कोणताही हिशोब अजून,शासनास दिला नाही. शिवाय जाणीवपूर्वक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील अनेक पदकविजेत्या खेळाडूंना अद्यापपर्यंत खेळाडूंच्या हक्काचे,मानाचे ब्लेझर व इतर क्रीडा साहित्य दिलेले नाही. 
       महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनला संलग्न असलेल्या सर्व राज्य खेळ संघटनांना मतदानाचे अधिकार प्राप्त व्हावे,तसेच गोवा,गुजरात व उत्तराखंड येथील नॅशनल गेम्ससाठी शासनाकडून घेण्यात आलेल्या करोडो रुपयांचा हिशोब शासनास सादर करावा,यासाठी मंगळवारी (ता. २३) दुपारी १२ वाजता पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथून आंदोलनास सुरुवात होईल, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या कार्यालयाबाहेर उपोषण करण्यात येणार आहे. उपोषण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे करणार असून,त्यांच्या सोबत मान्यता प्राप्त विविध खेळ संघटनांचे पदाधिकारी व राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू साखळी उपोषण करणार आहेत. 
आंदोलनात सहभागी खेळ संघटना 
कुस्ती, कबड्डी, हॅण्डबॉल, तायक्वांदो, जलतरण, बॉक्सिंग, बॉडीबिल्डिंग, नेटबॉल, टग ऑफ वॉर, आटापाट्या, बॉल बॅडमिंटन, यकलिंग, कुराश, मल्लखांब, रोलबॉल, सेपकटकरा, सॉफ्टबॉल, स्क्वॅश रॅकेट्स, टेनी कोल्ट, थांग-ता, कराटे, कॅरम, सॉफ्ट टेनिस, यॉटिंग, बेसबॉल, योगमहाराष्ट्र ऑलिंपिक’च्या विरोधात उपोषण 
खेळाडू, संघटक उतरणार मैदानात ः मतदानाचा अधिकार देण्याची मागणी 

पुणे :- महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनला ४७ ते ५० राज्य खेळ संघटना संलग्न आहेत.मात्र,काही खेळ संघटनांना महाराष्ट्र ऑलिंपिकच्या होणाऱ्या निवडणुकीला मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.बाकीच्या संघटनांना डावलण्यात आले आहे. यामुळे या संघटनांनी एकत्र येत मंगळवारी (ता.२३) उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळ संघटनांचे पदाधिकारी व राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू साखळी उपोषण करणार आहेत,अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली. 
ते म्हाणाले,महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशचे सरचिटणिस नामदेव शिरगावकर यांनी १५ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यकम जाहीर केला,तसेच या परिपत्रकासोबत निवडणुकीच्या मतदानास पात्र २२ खेळ संघटनाची यादी जाहीर केली.या अगोदर झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीत २७ खेळ संघटनांना मतदानाचे अधिकार देण्यात आलेले होते, तर आता होणाऱ्या निवडणुकीत कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, स्विमिंग व हॅण्डबॉल या पाच खेळांना वगळून फक्त २२ राज्य खेळ संघटनांना मतदानाचे अधिकार देण्यात आले आहेत.महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी संघटनेवर स्वतःचे वर्चस्व राहावे म्हणून जाणूनबुजून अनेक अधिकृत खेळ संघटनांना डावलल्याने महाराष्ट्रातील खेळांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. 
     महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनला ४७ ते ५० राज्य खेळ संघटना संलग्न आहेत.त्यामुळे या सर्व राज्य खेळ संघटनांना मतदानाचा अधिकार देणे क्रमप्राप्त असताना फक्त २२ राज्य खेळ संघटनांना निवडणुकीत मतदानाचे अधिकार देणे हा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांचा मनमानी कारभार आहे.सचिवांनी त्यांचा कार्यकाळात गोवा, गुजरात व उत्तराखंड येथे झालेल्या नॅशनल गेम्ससाठी शासनाकडून घेतलेल्या करोडो रुपयांच्या निधीचा कोणताही हिशोब अजून,शासनास दिला नाही. शिवाय जाणीवपूर्वक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील अनेक पदकविजेत्या खेळाडूंना अद्यापपर्यंत खेळाडूंच्या हक्काचे,मानाचे ब्लेझर व इतर क्रीडा साहित्य दिलेले नाही. 
       महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनला संलग्न असलेल्या सर्व राज्य खेळ संघटनांना मतदानाचे अधिकार प्राप्त व्हावे,तसेच गोवा,गुजरात व उत्तराखंड येथील नॅशनल गेम्ससाठी शासनाकडून घेण्यात आलेल्या करोडो रुपयांचा हिशोब शासनास सादर करावा,यासाठी मंगळवारी (ता. २३) दुपारी १२ वाजता पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथून आंदोलनास सुरुवात होईल, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या कार्यालयाबाहेर उपोषण करण्यात येणार आहे. उपोषण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे करणार असून,त्यांच्या सोबत मान्यता प्राप्त विविध खेळ संघटनांचे पदाधिकारी व राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू साखळी उपोषण करणार आहेत. 
आंदोलनात सहभागी खेळ संघटना 
कुस्ती, कबड्डी, हॅण्डबॉल, तायक्वांदो, जलतरण, बॉक्सिंग, बॉडीबिल्डिंग, नेटबॉल, टग ऑफ वॉर, आटापाट्या, बॉल बॅडमिंटन, यकलिंग, कुराश, मल्लखांब, रोलबॉल, सेपकटकरा, सॉफ्टबॉल, स्क्वॅश रॅकेट्स, टेनी कोल्ट, थांग-ता, कराटे, कॅरम, सॉफ्ट टेनिस, यॉटिंग, बेसबॉल, योग आदी. 
राज्यातील सर्वात जुन्या तायक्वांदो संघटनेलाही महाराष्ट्र ऑलिंपिकची मान्यता न देता बाहेर ठेवले आहे व दुसऱ्या गटाला हाताशी धरून भांडण लावून तायक्वांदो खेळातील अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळांडूवर अन्याय झाला आहे. सर्व अधिकृत जिल्हा संघटनांना बाजूला सारून तायक्वांदो खेळ हायजॅक केला आहे. 
-मिलिंद पठारे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई 

गेल्या दहा वर्षांपासून सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्राला सीएएम, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय), इंडियन ऑलिंपिक असोसिएशनची (आयओए) मान्यता असून, ही काही हेतूपुरस्सर कारणाने बाहेर ठेवले आहे. मतदानापासून वंचित ठेवले आहे. 
-प्रा. संजय साठे, सचिव, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र. आदी. 
राज्यातील सर्वात जुन्या तायक्वांदो संघटनेलाही महाराष्ट्र ऑलिंपिकची मान्यता न देता बाहेर ठेवले आहे व दुसऱ्या गटाला हाताशी धरून भांडण लावून तायक्वांदो खेळातील अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळांडूवर अन्याय झाला आहे. सर्व अधिकृत जिल्हा संघटनांना बाजूला सारून तायक्वांदो खेळ हायजॅक केला आहे. 
-मिलिंद पठारे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई 

गेल्या दहा वर्षांपासून सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्राला सीएएम, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय), इंडियन ऑलिंपिक असोसिएशनची (आयओए) मान्यता असून, ही काही हेतूपुरस्सर कारणाने बाहेर ठेवले आहे. मतदानापासून वंचित ठेवले आहे. 
-प्रा. संजय साठे, सचिव, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.