-->
आपला महाराष्ट्र 24

पद्मभूषण' अशोक सराफ यांची आज उलवे नगरीत एन्ट्री! मान्यवरांच्या मांदियाळीत सपत्निक भव्य नागरी सत्कार!

'
'बहुरूपी अशोक'ची मेजवानी रसिकांना विनामूल्य मिळणार!

उरण : सुनिल ठाकूर :
मराठी,चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, 'पद्मश्री' आणि 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारप्राप्त, अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांची सपत्निक एन्ट्री पहिल्यांदाच उलवे नगरीत होत आहे. मान्यवरांच्या मांदियाळीत त्यांचा भव्य नागरी सत्कार रविवारी (ता. २८) उलवे नोडमधील सेक्टर १९ मधील 'भूमिपुत्र भवन' येथे होणार आहे. रायगड, नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने हा नागरी सत्कार होणार आहे. हा सत्कार समारंभ शेलघर येथील यमुना सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आयोजित केला आहे. त्यामुळे अशोक सराफ यांच्या स्वागतासाठी उलवे नगरी सज्ज झाली आहे. सायंकाळी ६ वाजता 'बहुरूपी अशोक' या नरेंद्र बेडेकर निर्मित आर्केस्ट्राची मेजवानी रसिकांना विनामूल्य मिळणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या सत्कार समारंभाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, रायगडचे खासदार सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे, माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे रसिकांनी या सुवर्ण क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन यमुना सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि सचिव सौ. शुभांगीताई घरत यांनी केले आहे.

चौकट....
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी अनेक दशके मराठी मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांमुळे रसिकांना मनमुराद आनंद मिळाला आहे. अनेक पिढ्यांनी त्यांच्या चित्रपटांचा आस्वाद घेतला आहे. त्यांना चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. त्यांचा यथोचित गौरव मराठी मनातर्फे व्हावा, असे मला वाटत होते. त्यामुळेच त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले आहे.
- महेंद्रशेठ घरत, आंतरराष्ट्रीय कामगार नेते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.