-->
आपला महाराष्ट्र 24

साहित्य मानवी जीवनाला अमृत बनवते.'मधु कांकरिया

'
उरण: सुनिल ठाकूर
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे येथे हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख वक्त्या मधु कांकरिया यांनी आपल्या भाषणामध्ये वरील उद्गार काढले. महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवस सप्ताह विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला गेला. हिंदी दिवसाचे औचित्य साधून साहित्य आणि जीवन या विषयावर वरिष्ठ साहित्यकार मधु कांकरिया यांचे व्याख्यान दिनांक 25.09.2025 रोजी आयोजित केले होते. आपल्या व्याख्यानामध्ये त्यांनी मानवी जीवनासाठी असलेले साहित्याचे महत्त्व अधोरेखित करताना साहित्य मनुष्यबोध जागृत करून मानवता ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे याची शिकवण देते. असे मत व्यक्त केले. समाजा तील तळागाळातील लोकांच्या साठी साहित्य लिहिले गेले पाहिजे तसेच त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे उद्गार काढले. मधु कांकरिया यांनी आपल्या साहित्यिक जीवनाची सुरुवात साहित्य जीवनामध्ये आलेले अनुभव शेतकरी ,विद्यार्थी आदिवासी ,ग्रामीण व शहरी जीवनातील समस्या आदींवर भाष्य केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अमोद ठक्कर यांनी हिंदी भाषेचे महत्व स्पष्ट केले. त्याचबरोबर भाषा मानवी जीवनाचा मुख्य कारक असल्याचे भाष्य केले. हिंदी दिवसाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हिंदी साहित्यातील महत्त्वपूर्ण स्त्री रचनाकारांच्या विविध विषयावरील पुस्तकाचे प्रदर्शन हिंदी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आले होते. त्याचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मधु कांकरिया यांनी केले. विद्यार्थ्यांनी हिंदी साहित्याच्या प्रसिद्ध लेखिका त्यांचे व्यक्तित्व आणि साहित्यकृती संदर्भात माहितीचे संकलन केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मधु कांकरिया यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांसाठी तसेच एकूणच हिंदी भाषेच्या प्रसारासाठी राबविल्या गेलेल्या या विशेष उपक्रमाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. झेलम झेंडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सुजाता पाटील यांनी केले. राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संदीप घोडके व ग्रंथपाल सुप्रिया नवले तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख डॉ. झेलम झेंडे ,सहकारी प्राध्यापक डॉ. सुजाता पाटील महेश गोडबोले व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.