-->
आपला महाराष्ट्र 24

अभिनयाचा बादशहा अशोक सराफ यांच्या स्वागतासाठी उलवे नगरी सज्ज! मान्यवरांच्या साक्षीने होणार अशोक सराफ यांचा रविवारी भव्य नागरी सत्कार!


उरण : सुनिल ठाकूर
मराठी,चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, 'पद्मश्री' आणि 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारप्राप्त, अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांचा सपत्निक भव्य नागरी सत्कार रविवारी (ता. २८) उलवे नोडमधील 'भूमिपुत्र भवन' येथे मान्यवरांच्या साक्षीने होणार आहे. रायगड, नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने हा नागरी सत्कार होणार आहे. हा सत्कार समारंभ शेलघर येथील यमुना सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आयोजित केला आहे. यासाठी उलवे नगरी सज्ज झाली आहे.
या सत्कार समारंभाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, रायगडचे खासदार सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे, माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. 

गेली अनेक दशके मराठी मनावर अधिराज्य  ज्येष्ठ अभिनेते, रसिकांना खळखळून हसविणारे अवलिया अशोक सराफ यांना मानाचा मुजरा करण्यासाठी रसिक आतुर आहेत. या सत्कार सोहळ्याला रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. 

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणतात, "ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांमुळे रसिकांना मनमुराद आनंद मिळाला आहे. अनेक पिढ्यांनी त्यांच्या चित्रपटांचा आस्वाद घेतला आहे. त्यांना चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. त्यांचा यथोचित गौरव मराठी मनातर्फे व्हावा, असे मला वाटत होते. त्यामुळेच त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले आहे."
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.