उरण :सुनिल ठाकूर उमेद अभियानाच्या महालक्ष्मी सरस 2024” या भव्य प्रदर्शनाची काल सांगता झाली. या प्रदर्शनाने नवी मुंबईच्या कुठल्याही प्रदर्शनाच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढले. वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात भरलेल्या या प्रदर्शनात ग्रामीण महिलांच्या सर्व स्टा꙼ल फूड कोर्ट मधील सर्व स्टा꙼ल ची विक्री साधारण १९ कोटी ८० लाख रुपये एवढी झाली. ग्रामीण महिलांच्या कला आणि उत्पादनांना एक व्यावसायिक बाजारपेठ उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन नवी मुंबई येथे दुसऱ्यांदा आयोजित केले होते . या प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रातील महिला स्वसहाय्यता समूहांच्या आणि ग्रामीण कर्त्या कुटुंबांच्या विविध उत्पादनांसाठी एक समर्पित बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तसेच राज्यभरातील उत्पादनांची, विक्रीची आणि बाजारपेठांची माहिती समूह सदस्यांना देणे.
या प्रदर्शनाद्वारे शहरी नागरिकांना ग्रामीण आणि स्थानिक उत्पादनांचे, तसेच खाद्य पदार्थांचे अनोखे अनुभव प्रदर्शनातून घेता येतील. प्रदर्शनात दिसणारी उत्पादने विविध जिल्ह्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामुळे मुंबईकरांना आणि नवी मुंबईकरांना उच्च दर्जाची आणि विश्वसनीय वस्तू आणू पदाथांची खरेदी करता आली. याशिवाय, प्रदर्शनात देशभरातील पारंपारिक चवी, कलात्मक शिल्पकला आणि विशिष्ट उत्पादने देखील होती..
आयोजकांनी आशा व्यक्त केली की, या प्रदर्शनाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद ग्रामीण महिलांच्या कष्टांना एक नवीन दिशा देईल. हे प्रदर्शन १४ ते २५ डिसेंबर २०२४ सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी येथे आयोजित करण्यात आले होते .
उद्घाटन समारंभ
उद्घाटन समारंभाचा आयोजन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मान्यवर रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी “घे भरारी मला पंख मिळाले” या टीव्ही शो च्या सहभागी असलेले महिला खास अतिथी उपस्थित होते. मान्यवर रुचेश जयवंशी यांनी ग्रामीण महिलांच्या कला आणि व्यवसायांसाठी एक राष्ट्रीय व्यासपीठ देणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, “महालक्ष्मी सरस फक्त एक प्रदर्शन नाही, तर ग्रामीण महिलांच्या कला आणि व्यवसायांना मोठ्या व्यासपीठावर आणण्यासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. या प्रदर्शनाद्वारे त्यांचे उत्पादने राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवतील.”
प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे
प्रदर्शनात ४०० हून अधिक स्टॉल्स आहेत, जिथे हस्तनिर्मित कापड, साड्या, हस्तकला, शिल्पकला, मसाले, घरगुती वस्तू आणि महाराष्ट्राच्या पारंपारिक पदार्थांची विविधता दिसते. त्याशिवाय, महाराष्ट्राच्या समृद्ध पाककला वारशाचा अनुभव घेणारी ७० स्टॉल्स असलेली एक भव्य फूड कोर्ट देखील होते, जी एक प्रमुख आकर्षण राहिले. या प्रदर्शनात शहरी नागरिकांना ग्रामीण भारताच्या विविध कला आणि खाद्यशास्त्राची चांगली माहिती मिळवली
ग्रामीण महिला सशक्तीकरणासाठी अभियान
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) २०११ पासून कार्यरत आहे, ज्याचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे आहे. या मिशनअंतर्गत महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांतील ३५१ तालुक्यांमध्ये स्वयं सहाय्यता समूहांची स्थापना करण्यात आली आहे.
यामुळे ग्रामीण महिलांना उद्योजक म्हणून ओळख मिळवण्याचा एक उत्तम संधी प्राप्त झाली आहे. आतापर्यंत ६,४८,००० स्वसहाय्यता समूह, ३२,९४० ग्रामसंघ स्थापन झाली आहे आणि १,९५७ प्रभाग संघ, ४५० पेक्षा जास्त महिला शेतकरी उत्पादक कंपन्या व १०,५०० पेक्षा जास्त उत्पादक गट स्थापन करण्यात आले आहेत. अंदाजे ६५ लाख महिलांना या उपक्रमाद्वारे आर्थिक स्वावलंबन मिळाले आहे.
तसेच, अनेक राष्ट्रीय बॅंकांनी ग्रामीण महिलांसाठी कमी व्याज दरावर कर्जे देण्यास सुरुवात केली आहे. यावर्षीच ₹८,८६६ कोटी कर्जे ग्रामीण महिला उद्योजिकांसाठी उपलब्ध केली गेली आहेत.
ग्रामीण पाककलेचा समृद्ध अनुभव
प्रदर्शनात महाराष्ट्राच्या समृद्ध ग्रामीण पाककला वारशाचा अनुभव घेणारे पारंपारिक पदार्थ देखील नागरिकांनी अनुभवली आहेत. कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मटण थाळी, उकडिचे मोदक, माणदेशी मांडे, विदर्भातील खर्डा चिकन, मालवणी फिश फ्राय, आणि रॉयल चिकन बिर्याणी या खास पदार्थांमुळे उपस्थितांचे मन वेधून घेतले .
त्याचबरोबर, चवदार मिठाई, शुद्ध मसाले, लोणचं, चटणी आणि हुरडा यासारखे पदार्थ देखील प्रदर्शनाच्या आकर्षणात भर घालत होते.
प्रदर्शनात ग्रामीण महाराष्ट्राच्या हस्तकलेला देखील महत्त्व देण्यात आले आहे, ज्यामध्ये बांबू कला, हस्तनिर्मित वस्त्र, मातीचे वस्तू, गोंध चित्रकला, संगीतिक वाद्ये, भित्तिचित्रे, वर्ली चित्रकला, तुसर रेशीम आणि भरडधान्याचे नूडल्स यांचा समावेश आहे.
प्रदर्शनाला मिळालेला जोरदार प्रतिसाद
प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी पर्यंत , ₹ १९ कोटी ८० लाखाची उलाढाल झाली आहे. नवी मुंबईतील आणि मुंबईतील नागरिकांचा अप्रतिम प्रतिसाद आणि उत्साही सहभाग यामुळे अनेक स्टॉल्स वरील उत्पादने पूर्णपणे विकले गेले आहेत. सहभागी झालेल्या स्टॅाल धारक महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्याच प्रमाने व्यवसाय वाढीसाठी टनात ॲार्डर मिळाल्या हा उत्साहपूर्ण प्रतिसाद महालक्ष्मी सरस २०२४ चे यशस्वी आयोजन होण्यास कारणीभूत ठरला.
उमेद मार्ट: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म
ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना विस्तृत बाजारपेठ मिळवण्यासाठी उमेद अभियानाने “उमेद मार्ट” नावाचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. या उपक्रमाद्वारे ग्रामीण महिलांचे उत्पादन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी एक नवीन मार्ग प्राप्त होईल.ह्या पोर्टल द्वारे ग्रामिन महिला उदयोजीकांच्या ऊत्पादनाची सर्व माहिती, यादी उपलब्ध आहे.ज्या मुळे ग्राहकांना ॲानलाईन पद्धतीने घर बसल्या या उत्पदनांची खरेदी करता यईल.
या प्रदर्शनाद्वारे ग्रामीण महिलांच्या उत्पादनक्षमता वाढविणे, आर्थिक स्वतंत्रता मिळविणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हे उद्दिष्ट आहे. नवी मुंबईच्या नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या महत्त्वपूर्ण बदलात योगदान दिले आहे