उरण:सुनिल ठाकूर: सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने (STF), त्याचा भागीदार मन देशी चॅम्पियन्सच्या सहकार्याने, महाराष्ट्रातील सातारा येथे आधुनिक क्रीडा सुविधेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात STF च्या संचालक म्हणून सारा तेंडुलकरने उपस्थिती दर्शवली होती. तसेच फाऊंडेशनचे मिशन पुढे नेण्यासाठी तिची बांधिलकी सिद्ध केली. सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर यांनी उद्घाटन केलेल्या या नवीन क्रीडा केंद्रात बास्केटबॉल आणि बॅडमिंटनसाठी कोर्ट, इनडोअर कुस्ती आणि बॉक्सिंग क्षेत्र, वर्गखोल्या, प्रशासन कार्यालये आणि 150 खेळाडूंसाठी वसतिगृहे यासह जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. या केंद्राचा उद्देश ग्रामीण युवकांना उच्च दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम बनवणे हे आहे.
आपल्या पालकांसोबत आलेल्या सारा तेंडुलकरने तरुणांच्या आयुष्यावर होणाऱ्या खेळाच्या परिवर्तनीय प्रभावाबद्दल सांगितले. तसेच तेथील मुलांसोबत काही क्षण देखील शेअर केले.
मन देशी चॅम्पियन्सकडे ग्रामीण प्रतिभेचे संगोपन करण्याचा एक ट्रॅक रेकॉर्ड आहे, त्यांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून 100 हून अधिक खेळाडू सैन्य, पोलीस, वन आणि रेल्वेमध्ये सहभागी झाले आहेत. दादा आणि अजिनाथ शिंगाडे सारखे माजी विद्यार्थी, 1500 मीटर राष्ट्रीय रौप्यपदक विजेते आता सशस्त्र दलात सेवा देत आहेत तर राष्ट्रीय पदक विजेती कुस्तीपटू अरु खांडेकर, हे या उपक्रमाचे यश सिद्ध करतात.
दंतेवारा, छत्तीसगड येथे 50 क्रीडांगणे तयार करणे, 300 हून अधिक खेळाडूंना प्रशिक्षण देणे आणि 2,000 सरकारी शाळेतील क्रीडा प्रशिक्षकांना नवीन सुविधेमध्ये प्रमाणित करून आगामी वर्षात आपला विस्तार वाढवण्याची योजना मन देशी चॅम्पियन्सने आखली आहे.
सचिन आणि डॉ. अंजली तेंडुलकर यांनी 2019 मध्ये स्थापन केलेली STF, ही क्रीडा, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातील विविध उपक्रम राबवून तरुणांचे जीवन बदलण्यासाठी सज्ज आहे.