उरण:सुनिल ठाकूर
उलवेकरांसाठी एक भन्नाट करमणूक घेऊन आलेला ‘क्लाउन स्टार – द सर्कस शो’ याचा भव्य शुभारंभ भूमिपुत्र भवन, सेक्टर १९B येथे मोठ्या जल्लोषात साजरा झाला. १९ आणि २० जुलै रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रेम यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या शोमध्ये भारत तसेच परदेशातील नामवंत व्यक्तींची उपस्थिती दिसून आली. रंगीत लाईट्स, थरारक सादरीकरणं आणि हास्याने भरलेला माहोल यामुळे उपस्थित प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
क्लाउन स्टार सर्कस शो' कलाकारांनी दिलेल्या हवाई कसरती, थरारक स्टंट्स, मजेशीर जोकर आणि शारीरिक चपळाईचे अद्वितीय प्रदर्शन प्रेक्षकांची मने जिंकून गेले.
दररोज दोन शो – दुपारी ४ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता आयोजित केले जात आहेत, जेणेकरून सर्व वयोगटातील प्रेक्षक शोचा आनंद घेऊ शकतील.एअर कंडिशन्ड इनडोअर हॉलमध्ये कार्यक्रम होत असल्यामुळे उष्णता किंवा पावसाची चिंता नाही.मुख्य आकर्षण:
अकल्पनीय हवाई स्टंट्स,
जोकर्सची धमाल करामत.,
बलवान कलाकारांची शक्तीप्रदर्शनं
आणि शरीर लवचिकतेचे कौशल्य दाखवणारे कलाकार!
कार पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे कुटुंबासह शो पाहण्यास अजिबात अडचण येणार नाही.
तिकिटं ticketkhidakee.com या वेबसाइटवर तसेच थेट स्थळावरच्या बुकिंग काउंटरवर उपलब्ध आहेत. प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहता तिकिटं लवकर बुक करण्याचा सल्ला दिला जातो.
‘क्लाउन स्टार सर्कस शो’ म्हणजे केवळ सर्कस नव्हे, तर हास्य, थरार, कलेचा अद्भुत संगम – जो प्रेक्षकांच्या मनात कायमचा ठसे उमटवेल असे आयोजक प्रेम आणि आकाश यांनी माहिती देताना सांगितले.