-->
आपला महाराष्ट्र 24

हरेश्वर जनार्दन ठाकूर आपदा विशेष सन्मान पुरस्कारा ने सन्मानित.


उरण (सुनिल ठाकूर ).
आज दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी  जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग  यांच्या कडून  आपदा मित्र, नागरी संरक्षण दल ह्यांचा विशेष सन्मान पत्र पुरस्कार सन्मानिय महिला व बालकल्याण मंत्री मा. आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते उरण सावरखार येथील हरेश्वर जनार्दन ठाकूर यांना आपदा विशेष सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले, 
या अगोदर त्यांना  रायगड भूषण पुरस्कार अदिती तटकरे यांच्या हस्ते स्वीकारण्याची भाग्य लाभले होते.
यावेळी आपले मनोगत    सांगताना हरेश्वर ठाकूर  म्हणाले की,
आपदा मित्र, नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवक ते जिल्हाधिकारी कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढा मोठा विशेष सन्मान पत्र हा सन्मानित प्रवास पूर्ण करण्यासाठी अनेकांची मोलाची साथ लाभली या प्रवासात  प्रशासकीय अधिकारी  माननीय श्री.  उद्धव कदम साहेब (तहसीलदार उरण तालुका), रायगड जिल्ह्यात नावारूपाला आणली ते सन्मानिय विद्यमान कोकण आयुक्त डॉ  महेंद्र कल्याणकर साहेब  यांची प्रेरणा  मोलाची आहे .
 विद्यमान जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सन्मानिय किसन ना. जावळे साहेब यांनी आमच्या कार्यावर दाखवलेला विश्वास हा महत्त्वपूर्ण आहे.
आपदा परीवाराचे सर्वांत हक्काची व्यक्ती म्हणून नेहमी ज्यांच्या कडे पाहिलं जातं ते माननीय श्री सागर पाठक सर {आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रायगड जिल्हा} यांनी वेळोवेळी दाखवलेला विश्वास, मार्गदर्शन, मा. मनोहर म्हात्रे सर {राष्ट्रपती पदक प्राप्त} ह्यांनी शिष्य म्हणून आम्हाला दिलेलं ज्ञान, आज आम्ही समाजापर्यंत निस्वार्थी भावनेने पोहचवत आहोत.
  सदर रायगड जिल्हा सन्मान पुरस्कार हा आपत्ती परिस्थितीमध्ये पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका करणे, शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्ले तसेच शासन आपल्या दारी महाड येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये गर्दी नियंत्रणाचे प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मा. मंत्री महोदयाच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.