उरण (सुनिल ठाकूर ).
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला आईचे स्थान आहे. जन्मदात्या आईप्रमाणेच गोमातेची सेवा करणे ही सौभाग्याची गोष्ट आहे. आज अनेकांना गाईची सेवा, संगोपन, पूजन करण्याची इच्छा असते, ती गो शाळेच्या माध्यमांतून पूर्ण केली जात आहे.
गोशाळा म्हणजे भारतातील भटक्या गायींसाठी संरक्षणात्मक आश्रयस्थान आहेत. त्यांना मराठीत पांजरपोळ म्हणतात. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ईर्शालवाडी येथील भक्ती वेदांत गोआश्रम चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने गोशाळा आहे. गोशाळा कसली; गोमातांचं माहेरचं आहे ते ! या गोशाळेमध्ये आज ४० गाई आहेत. त्यांच्या देखभालीसाठी प्रशिक्षित डॉक्टर येतात. त्यांच्या चाऱ्या -पाण्याची आणि खुराकाची येथे पोटच्या लेकरासारखी काळजी घेतली जाते. शुद्ध दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कमालीचे स्वादिष्ट आहेत. तुम्हीही चाखाल तर प्रेमात पडाल. दरवर्षी प्रमाणे यावर्षी १५ ऑगस्ट या दिवशी या गो शाळेत उत्साह साजरा केला जातो. सकाळी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक, सत्यनारायणाची महापूजा त्यानंतर भजन,हभप अनंत महाराज पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आणि नंतर महाप्रसादचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बालश्रीराम गव्हाणे (वाशी ),कमळजी कोठारी (कळंबोली ),कैलास शेठ म्हात्रे (उपसरपंच कोन ),नामदेवशेठ गाताडे,लक्ष्मण म्हात्रे,संजय म्हात्रे,
दिनेश पाटील, नवनाथ मुंढे, सह संस्थापक अध्यक्ष हभप दिनेश महाराज मते अध्यक्ष हभप अनंत महाराज पाटील,विश्व् हिंदू परिषद चे सुनिल उतेकर,सुभाष कडव,किरण मते,सपना दिनेश मते . सह परिसरातील गावकऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्याने या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.