-->
आपला महाराष्ट्र 24

उरण मध्ये उबाठा गटाला धक्का ! ठाकरे गटाच्या सरपंच काशीबाई ठाकूर अपात्र!जसखारच्या सरपंचपदावर प्रणाली म्हात्रे विराजमान

उरण (सुनिल ठाकूर ).
जसखार ग्रामपंचायतीच्या ठाकरे गटाच्या सरपंच काशिबाई ठाकूर यांचे पद हे शासकीय जागेत केलेल्या अतिक्रमणामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्र केले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जसखार ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रणाली किशोर म्हात्रे यांची निवड करण्याचे आदेश उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समिर वाठारकर यांनी दिले होते. जसखार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाच्या प्रणाली किशोर म्हात्रे यांनी बुधवारी (दि. २४) ग्रामपंचायतीचा सरपंच पदाच्या कार्यभार स्विकारला आहे.
          जसखार गावाच्या सरपंच म्हणून आज सौं. प्रणाली किशोर म्हात्रे ह्यांनी एका विशेष समारंभात, सन्मानाने पदभार स्वीकारला. जसखार ग्रामपंचायतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली, तेव्हापासून आतापर्यंतच्या सुमारे 80 वर्षांच्या कालावधीत, सर्वात कमी वयाची आणि पदवीधर सरपंच म्हणून झालेली त्यांची निवड हा एक रेकॉर्ड आहे.
        सौं. प्रणाली म्हात्रे ह्या उत्तम सामाजिक कार्यकर्त्यां असून, युवा सामाजिक संस्थेच्या कार्यात आघाडीवर असतात. तसेच त्या शिवसेनेच्या महिला तालुका अध्यक्ष ह्या पदावर कार्यरत असून राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करित आहेत ज्यामध्ये त्यांना सासर आणि माहेरच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळतो.जसखार गावातील अनेक समस्या सोडविण्यात त्या आणि त्यांच्या इतर पाच सहकारी महिला सदस्या नेहमीच पुढाकार घेतात. सीमा ठाकूर, दमयंती म्हात्रे, हेमा ठाकूर, धनवंती ठाकूर आणि वैजयंती ठाकूर ह्या पाच रणरागिनींच्या सहकार्याने त्यांनी गेल्या दीड वर्षात जसखार ग्रामपंचायतीमध्ये गेली वीस वर्षे चालणारा प्रचंड भ्रष्टाचार,एका कुटुंबाची घराणेशाही संपवून टाकण्याचा अथक प्रयत्न चालवीला आहे.
        जसखार मधील बहुसंख्य ग्रामस्थ त्यांचे अभिनंदन करित असून स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी ह्या सहा महिला सदस्यांना पाठिंबा व्यक्त करित आहेत. पूर्वीच्या अशिक्षित, घराणेशाहीने लादलेल्या सरपंचांपेक्षा ही सुशिक्षित आणि प्रामाणिक सरपंच गावाचा निश्चित कायापालट करील असा ग्रामस्थांना ठाम विश्वास वाटत आहे . समाजाच्या सर्व थरातून प्रणाली आणि तिच्या पाच सहकाऱ्यान्वर अभिनंदनाचा वर्षाव होत असून एका नवीन युगाची सुरुवात होण्याची अपेक्षा ग्रामस्थ बाळगून आहेत.
         सदर पदावरोहण समारंभाच्यावेळी शिवसेनेचे उरण विधानसभा निरीक्षक रुपेश पाटील, अतुल भगत, दीपक ठाकूर, गणेश घरत , अभिमन्यू निंबाळकर , अनिल मुंढे आणि युवा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी हर्षल ठाकूर, किशोर म्हात्रे, संदीप भोईर,नितीन पाटील,गर्दीश म्हात्रे, सूर्यकांत ठाकूर, सुरेश म्हात्रे, निशांत ठाकूर,जनार्दन म्हात्रे,प्रदीप म्हात्रे,जयवंत घरत, मयूर तांडेल, रणजित पाटील,रितेश म्हात्रे,तेजस घरत, गणेश ठाकूर, भालचंद्र म्हात्रे, मनिष म्हात्रे आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच महिला आघाडीच्या मंजुळा म्हात्रे, प्रीती ठाकूर,आशा म्हात्रे, आशा कडू आणि बचत गटाच्या अनेक सदस्या शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होत्या.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.