-->
आपला महाराष्ट्र 24

बी. एस. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.


उरण (सुनिल ठाकूर )–आज  दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी विंधणे येथील के.बी. पाटील एज्युकेशनआणि वेलफेयर सोसायटीच्या बी. एस. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंतीचे  आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने व प्रतिमा पूजनाने झाली . शिवजयंती हा उत्सव प्रत्येक महाराष्ट्रवासी साठी अभिमानाची गोष्ट आहे. संस्कार हे लहानपणापासून केले जातात याचे उदात्त उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असेच संस्कार प्रत्येक बालकांमध्ये येण्यासाठी त्यांना  शिवाजी महाराजांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे .यासाठी शालेय उपक्रम मोलाचे कामगिरी बजावत असतात त्यापैकीच हा एक उपक्रम शाळेने राबविला .या  कार्यक्रमांमध्ये कुमार समर गीतेश  जोशी जुनिअर केजी यांने  शिवाजी महाराजांची वेशभूषा करून महाराजांना मानाचा मुजरा केला तसेच कुमारी मोक्षा स्नेहल जोशी नर्सरी या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ यांचे वेशभूषा केली तसेच कुमार युनय सोमनाथ मढवी व शैलेश रोशन यादव व प्रिन्स रोशन यादव ज्युनिअर केजी यांनी मावळ्यांची वेशभूषा करून कार्यक्रमाला जिवंतपणा आणला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कैलास बंडू पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  शिवाजी महाराजांबद्दल विशेष माहिती सांगून त्यांना प्रोत्साहित केले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.