-->
आपला महाराष्ट्र 24

महात्मा फुले आर्ट सायन्स अँड. कॉमर्स महाविद्यालय पनवेलच्या विद्यार्थ्यांना टायकोंडोचे मोफत धडे . पंधराशे ते दोन हजार विद्यार्थ्यांना आत्मरक्षणाचे धडे.

उरण (सुनिल ठाकूर ) महात्मा फुले आर्ट सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय पनवेल व रायगड तायकवोंडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर गणेश ठाकूर प्राचार्य एम पी ए एस सी कॉलेज पनवेल यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की सुभाष पाटील हे आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी असून ते स्वतः कॉलेज साठी दरवर्षी आपल्या विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण देतात त्यांचे खूप मोठे योगदान आहे आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनींना टायकोंडो या खेळामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून दिलेली आहेत खेलो इंडिया स्पर्धेसाठी आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी निर्मिती दत्ता हिची निवड झाली आहे कॉलेजच्या विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिक शक्तीला चालना देण्यासाठी तसेच कॉलेज आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याचा उद्देशाने त्यांना स्वयंसेरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींची सेड काढण्याचे प्रकार घडतात अनेकदा त्यांच्यावर वाईट प्रसंग ही वाढवतात अशी अनेक उदाहरणे सांगता येतील तेव्हा अशा प्रकारच्या घटनाही वारंवार घडतात महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत विशेषतः कॉलेजच्या विद्यार्थिनींचे स्वयंरक्षणासाठी आत्मबल वाढले पाहिजे त्याचबरोबर मुलींनी गुन्हेगारी विरोधात लढण्यासाठी सक्षम व्हावे या उद्देशाने महात्मा फुले कॉलेज अंतर्गत असे उपक्रम राबविण्यात येतात हे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय पंच सातवी डिग्री व मुख्य प्रशिक्षक सुभाष पाटील यांचे सहकारी प्रभाकर भोईर  राकेश जाधव तेजस माळी अक्षता भगत गौरी पाटील आणि सनी पासवान निर्मिती दत्ता इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.