उरण(सुनिल ठाकूर ) : 3M कंपनीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सला 'एशिया सेफ सर्जिकल इम्प्लांट कन्सोर्टियम क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट (क्यूआयपी) अवॉर्ड 2023'' देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार देऊन डब्ल्यूएचओने आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्याच्या अपोलोच्या अतूट वचनबद्धतेचे कौतुक केले आहे आणि जगातील सर्वोत्तम संस्थांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णालय ज्या प्रकारे रुग्णांच्या सुरक्षिततेवर आणि वैद्यकीय परिणामांवर लक्ष केंद्रित करीत आहे आणि शस्त्रक्रियेच्या सुरक्षेतील उत्कृष्टता प्रदान करत आहे. अपोलो हॉस्पिटल्सच्या वचनबद्धतेचा देखील हा सन्मान आहे. आरोग्यसेवेच्या क्लिष्ट विश्वात, सेंट्रल स्टेराइल सप्लाय डिपार्टमेंट (सीएसएसडी) अदृश्य संरक्षक म्हणून उभे आहे, तसेच निर्दोष वैद्यकीय सेवा आणि संक्रमणांपासून संरक्षण देण्याकरिता सहाय्य करते.
डॉ.स्नेहा वैद्य, नर्सिंग संचालक-पश्चिमी क्षेत्राच्या प्रादेशिक, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाल्या की,"डब्ल्यूएचओ कडून एशिया सेफ सर्जिकल इम्प्लांट कन्सोर्टियम क्यूआयपी अवॉर्ड 2023 मिळवणे हाच एक मोठा सन्मान आहे, विशेषत: निर्जंतुकीकरण पद्धत क्लिष्ट असल्यामुळे त्यात सहजासहजी उत्कृष्टता आणता येत नाही. लोनर इन्स्ट्रुमेंट आणि इम्प्लांट्सच्या निर्जंतुकीकरण प्रक्रियेत वृद्धी करणे हा बहु-वैशिष्ट्य असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना वैद्यकीय सेवा प्रदान करण्यामधील एक महत्त्वाचा पैलू आहे. आणि डब्ल्यूएचओने या क्षेत्रातील आमच्या उत्कृष्टतेला मान्यता दिल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही आमच्या रुग्णांना यापुढे देखील जागतिक दर्जाचे उपचार प्रदान करणार आहोत आणि वैद्यकीय सुरक्षेसाठी नवीन पायंडा पाडणे आहोत.”
प्रो.विंग हाँग सेटो, सह-संचालक द युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग, डब्ल्यूएचओ कोलॅबोरेटिंग सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीज एपिडेमियोलॉजी अँड कंट्रोल, स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ म्हणाले की,“लोनर इन्स्ट्रुमेंट आणि इम्प्लांट लोड मॅनेजमेंट, चेकलिस्ट तयार करणे, प्रशिक्षण घेणे या कार्यांमध्ये एसओपी विकसित करण्यासाठी गुणवत्ता, शल्यचिकित्सक, मायक्रोबायोलॉजिस्ट, किंवा आणि सीएसएसडी टीम सारख्या प्रमुख भागधारकांना सामील करून घेण्यासाठी आणि लोड इन्स्ट्रुमेंट आणि इम्प्लांटची सुरक्षित पुनर्प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी अपोलोच्या टीमने केलेल्या प्रयत्नांची मी मनापासून प्रशंसा करतो.”
राजीव गुप्ता,बिझनेस-कंट्री बिझनेस लीडर हेल्थकेअर, 3M इंडिया लिमिटेड म्हणाले,“3M ने नेहमीच शस्त्रक्रियेचे परिणाम सुधारण्यासाठी आणि रुग्णाला सुरक्षा देण्यासाठी ऑपरेटिंग रूममध्ये सर्जिकल इम्प्लांट लोड आणि लोनर सेट आणि आरोग्य केंद्रांमध्ये सेंट्रल स्टेराइल सर्व्हिसेस डिपार्टमेंट व्यवस्थापित करण्यासाठी योगदान दिले आहे. क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट (क्यूआयपी) केल्याने प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याच्या आणि मार्गदर्शक तत्त्वे आणि मानकांचे पालन करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला जातो. एशिया सेफ सर्जिकल इम्प्लांट क्यूआरपी लाँच करण्यासाठी 3M ने डब्ल्यूएचओ सहयोग केंद्रासोबत एकत्र मिळून काम केले. अपोलोने दाखविलेल्या समर्पण आणि अथक प्रयत्नांसाठी 3M इंडिया अपोलो टीमचे अभिनंदन करते.”
अपोलो हॉस्पिटल्सचे पश्चिमी विभागाचे प्रादेशिक सीईओ संतोष मराठे म्हणाले,"हा डब्ल्यूएचओचा क्वालिटी इम्प्रूव्हमेंट अवॉर्ड म्हणजे रुग्णांना सुरक्षा आणि उत्कृष्ट आरोग्यसेवा देण्याच्या नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या अटळ बांधिलकीचा पुरावा आहे आणि आमच्या सीएसएसडी आणि ओटी टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे यश आहे. आमच्या सीएसएसडी सेवांना एपीएसआयसी आणि सीएएचओ यांच्याकडून मान्यता मिळाली आहे तसेच आम्ही रूग्णांना प्रदान केलेल्या सुरक्षित पद्धती आणि मार्गांना जणू अनुमोदन मिळाले आहे. आमच्या रूग्णांसाठी उच्च पातळीची सुरक्षितता प्रदान करण्यासाठी निर्जंतुकीकरणाच्या पद्धतीत विकास करुन शस्त्रक्रियात्मक सुरक्षा आणि परिणाम सुधारण्यासाठी जागतिक प्रयत्नांमध्ये योगदान दिल्याचा आम्हाला अभिमान आहे."