उरण (सुनिल ठाकूर ).
लातुर येथील महानगर पालिकेच्या शाळा नं-४ चे मुख्यध्यापक अब्दुल हमीद बिजापूरे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावरील गोल्डन स्टार एक्सलन्स पुरस्काराने नुकतेच महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या विशेष सहकार्याने इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन व अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या वतीने साहित्य मंदिर,वाशी येथे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या कार्यप्रतिमा सन्मान महासंमेलनात दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
अब्दुल हमीद बिजापूरे यांचे वृक्षारोपण, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, भुकंपग्रस्त करीता विशेष कार्य, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम, तंबाकुमुक्त अभियान, राष्ट्रीय एकात्मता करीता प्रचार व प्रसार व तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न इत्यादी कार्य सातत्याने सुरू आहे.
सदरहु पुरस्कार सोहळ्यास नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, श्रीमंत संभाजीराव जाधव, डॉ.अमजद खान पठाण, अँड रमेश राठोड, जीएसटी चे डेप्युटी कमिशनर यास्मिन मोलकर, वैजापूर चे तहसीलदार सुनील सावंत,संगीतकार दत्ता कोळी, उद्योजक अश्फाक मन्सुरी व गीता मृच्छला, संयोजक एन.डी.खान व सौ.सलमा खान उपस्थित होते.
लातुरचे सुपुत्र अब्दुल हमीद बिजापूरे यांना राष्ट्रीय स्तरावरील गोल्डन स्टार एक्सलन्स पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल समाजाच्या विविध स्तरातील लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.