-->
आपला महाराष्ट्र 24

गणेशोत्सवाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या हातांचा सन्मान.

उरण (सुनिल ठाकूर ).
मानाचा चौथा महागणपती 
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने पुण्याच्या गणेशोत्सवाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या हातांचा सन्मान करण्यात आला. अग्निशमन दलातील अधिकारी, जीव रक्षक आणि ज्यांच्या सहकार्याने गणेशोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला अशा सर्व पडद्यामागील व्यक्तींना सन्मानचिन्ह ,शाल, श्रीफळ देऊन  कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 
आमदार माधुरीताई मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंतभाऊ रासने आणि ललितशेठ जैन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. यावेळी  किशोर सरपोतदार, रामदास तुळशीबागवाले , सुभाष सरपाले, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, हुतात्मा बाबूगेनू मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ पवार, 
जिलब्या मारुती मंडळाचे विश्वस्त भूषण पंडय़ा 
दत्ताभाऊ कावरे,मोहन साखरीया, मयूर दिवेकर, साई डोंगरे, प्रदीप इंगळे, किरण चौहान श्रीमती अभिनेत्री वाळके,सुनंदा कांगणे, महिला सभासद,आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 
यावेळी माधुरी मिसाळ  म्हणाल्या,की,  पुण्याचा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अनेकांचे योगदान असते. त्यामध्ये स्वच्छता कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी यांचे कार्य निश्चितच महत्त्वाचे आहे. आपल्या जीवाची काळजी न करता अग्निशमन दलाचे अधिकारी काम करत असतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे.
अग्निशमन दल अधिकारी, जीव रक्षक, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह वाद्यपथकतील वादक, सजावट कलाकार, मांडववाले, पौरोहित्य करणारे गुरुजी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
 विनायक कदम यांनी आभार मानले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.