-->
आपला महाराष्ट्र 24

प्रा.डॉ. मऱ्याप्पा सोनवले यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार

उरण (Sunil thakur)
रयत शिक्षण  संस्थेच्या फुंडे ( उरण ) येथील वीर वाजेकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ मऱ्याप्पा चुडाप्पा सोनवले यांना मुबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार  प्राप्त झाला. सदर पुरस्काराचे वितरण 5 सप्टेंबर सर फिरोजशहा मेहता सभागृहात कलिना, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते. पाच हजार रूपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. सोनवले यांना आत्ता पर्यंत बरेच पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये पनवेल गौरव पुरस्कार राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, आदर्श प्राध्यापक पुरस्कार यांचा समावेश आहे. मिळाले आहेत. डॉ मऱ्याप्पा सोनवले यांचे संशोधन कार्य,संशोधन पेपर, पेंटेंट व जागतिक स्तरावरील संशोधन कार्य लक्षात घेऊन, त्यांची या पुरस्कारासाठी  निवड केली आहे.

डॉ. सोनवले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ पी. जे.पवार लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर सीडीसीचे सर्व सदस्य व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.