-->
आपला महाराष्ट्र 24

कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत शितोळे वाडी तालुका पेण येथील कातकरी बांधवांना वन हक्क जमिनीचे मिळणार अधिकृत ऑनलाईन सात बारा उतारे. कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, अपर जिल्हाधिकारी श्री थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली, उप विभागीय अधिकारी पेण श्री प्रविण पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्व पूर्ण निर्णय तहसीलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे मॅडम, वन अधिकारी श्री कुलदीप पाटकर साहेब, भूमी अभिलेख विभागाचे प्रमुख श्री बाविस्कर साहेब , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण श्री आनंद पाटील साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोळे साहेब यांनी सदरहू प्रस्तावास एकमताने दिली मान्यता संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना पंधरा दिवसात ऑनलाईन सात बारा उतारे तयार करून देण्याचे आदेश अधिकृत सात बारा उतारे आणि जमिनीची मोज मापनी झाल्याशिवाय नियोजित पोलीस स्टेशन चे काम सुरू होणार नाही


उरण (सुनिल ठाकूर ).
मंगळवार दिनांक 06/09/2023 रोजी झालेल्या बैठकीत शितोळे कातकरी वाडी वरील वासुदेव वाघमारे, नारायण नाईक, बाबू नाईक आणि इतर नागरिकांनी आपले प्रश्न मांडले. सदरहू प्रश्न अतिशय योग्य असून ते आम्हाला मान्य आहेत अशी सुरुवातच मान उप विभागीय अधिकारी श्री पवार साहेब यांनी केल्याने सर्वांना आनंद झाला. वन अधिकारी पाटकर साहेब, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे मॅडम, भूमी अभिलेख विभाग प्रमुख बाविस्कर साहेब यांच्याशी चर्चा करून कातकरी बांधवांना वन हक्क जमिनीचे अधिकृत ऑनलाईन सात बारा देण्याचे मान्य केले आणि विषय संपवून टाकला. सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, ॲड धनंजय पाटील यांनी आदिवासी बांधवांची कायदेशीर बाजू मांडली. प्रा राजेंद्र मढवी यांनी ह्या विषयासंदर्भात समन्वयक म्हणून भूमिका बजावून विषय कसा मार्गी लागेल आणि आदिवासी कुटुंबाना न्याय मिळून नियोजित पोलीस स्टेशन चा मार्ग मोकळा होईल ह्या करिता प्रामाणिक प्रयत्न केले आणि ते खऱ्या अर्थाने यशस्वी झाले असे म्हणायला हरकत नाही. प्रा राजेंद्र मढवी यांनी सर्व अधिकारी वर्गाचे आणि सर्वांचे आभार मानले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.