-->
आपला महाराष्ट्र 24

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नाने उलवेनोड वासियांना १० वर्षांनी मिळाली स्मशानभुमी

उरण (सुनिल ठाकूर ).
 सिडको विकसित करत असलेल्या उलवे नोड वासियांना 10 वर्षापासून हक्काची स्मशानभुमी नव्हती. अंत्यविधीसाठी नातेवाईकांना खारघर, बेलापूर येथे जावे लागत होते. परंतू रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे मागील दोन ते तीन वर्षापासून स्मशानभूमी साठी पाठपुरावा करत होते,अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. नुकतेच काँग्रेस नेते महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते उलवेनोड स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले .
महेंद्रशेठ घरत हे नेहमिच गावांच्या विकासासाठी रस्ते, समाज मंदिरे गटारे, हायमास्ट अशी लोकपयोगी कामे करत असतात.खारकोपर रस्त्याच्या वेळी अडथळा येणारा घर त्यांनी स्वतःच्या खर्चातून बांधून दिला व रस्त्याला मार्ग मोकळा केला.अशा प्रकार स्वर्गीय दि.बा.पाटील साहेबांच्या नंतर समाजासाठी कार्य करणारे महेंद्रशेठ घरत हे एकमेव नेते आहेत.
या स्मशानभूमीच्या लोकार्पण प्रसंगी मा. उपसरपंच सचिन घरत, ग्रा. सदस्य अरुण कोळी, रोशन म्हात्रे, राकेश घरत, सचिन येरुणकर तसेच आम्ही उलवेकर मित्रमंडळाच्या महिला भगिनी उपस्थित होत्या. हक्काची स्मशानभूमी मिळवून दिल्याबद्दल उलवे वासियांनी महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.