-->
आपला महाराष्ट्र 24

डाबर ओडोमोस तर्फे डेंग्यू मुक्त भारत मोहीम सुरू डेंग्यू आणि मलेरियापासून बचाव करण्याबाबत जनजागृती


उरण (सुनिल ठाकूर ).
 भारताला डेंग्यूमुक्त करण्याचे आपले ध्येय पुढे नेत, डाबरचा देशातील सर्वाधिक पसंतीचा वैयक्तिक ऍप्लिकेशन मॉस्किटो रिपेलेंट ब्रँड ओडोमोसने आज #MakingIndiaDengueFree ही विशेष मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे लोकांपर्यंत पोहोचून त्यांना डासांपासून बचाव करण्याच्या उपायांची जाणीव करून दिली जाईल. डेंग्यू पसरवणाऱ्या डासांपासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांना ओडोमोस मॉस्किटो रिपेलेंट क्रीम हे वाटप करण्यात आले .
डाबरने ही मोहीम नवी मुंबई येथून सुरू केली असून  शिवकल्याण शाळेतील 300 हून अधिक मुलांसह एक विशेष जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी, त्यांचे शिक्षक व पालकांना डेंग्यू पसरवणाऱ्या डासांपासून बचाव करण्याच्या पद्धतींची माहिती देण्यात आली. यासोबतच डासांपासून पसरणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्याबाबत आवश्यक माहिती देण्यात आली.
यावेळी डाबर इंडिया होम केअर लि.चे श्रेणी प्रमुख संतोष जयस्वाल म्हणाले की,'ओडोमोस नेहमीच डेंग्यू आणि इतर घातक डासांपासून पसरणाऱ्या आजारांपासून लोकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या मोहिमेला पुढे नेत आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना डासांपासून होणा-या आजारांपासून सुरक्षित राहण्याची जाणीव होईल. गेल्या काही वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांमध्ये डेंग्यूबाबत जागृतीचा अभाव आहे. एडिस इजिप्ती हा डेंग्यू पसरवणारा डास दिवसा चावतो. अशा परिस्थितीत शाळेत जाणारे विद्यार्थी आणि कार्यालयात जाणारे लोक या डासांचा सहज बळी ठरतात. त्यामुळेच डेंग्यूच्या डासांपासून आपण स्वत:ला कसे सुरक्षित ठेवू शकतो याबाबत सर्वसामान्यांना जागरूक करणे आवश्यक आहे. 
यावेळी आदित्य हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटी नवी मुंबईचे अध्यक्ष डॉ. प्रतिक तांबे म्हणाले की, “डेंग्यू सारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंध करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती सहज होते, त्यामुळे शाळकरी मुले आणि कार्यालयात जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरुकता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. या विचाराने मेकिंग इंडिया डेंग्यूमुक्त अभियान सुरू करण्यात आले आहे. मला त्याच्याशी जोडण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.