उरण (सुनिल ठाकूर ).
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील रयत शिक्षण संस्थेचे
द्रोणागिरी हायस्कूल करंजा मराठी , इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम यांच्या वतीने
नारळी पौर्णिमा उत्सव 2023 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.नारळाची प्रतिकृती विद्यालयातील कला शिक्षक जोशी सर यांनी खुप सुंदर बनविली होती.
सुरवातीलाच लेझीम पथकाने नारळाच्या प्रतिकृती भोवती गोल रिंगण धरून ,नाचून सलामी दिली.
करंजा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन श्री प्रदीप नाखवा, विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा, व्हा.चेअरमन राजेंद्र कोळी व सोसायटीचे सदस्य, विद्यालयाचे व्हा.चेअरमन के. एल. कोळी व सदस्स.मुख्याध्यापक श्री एम् .जी.म्हात्रे सर .इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रभु मॅडम.यांनी व ग्रामस्थ
यांनी पूजन केले. काही विद्यार्थी आपल्या पारंपरिक कोळी वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झाले होते.
द्रोणागिरी ब्रास बॅन्डचे अध्यक्ष कमलाकर थळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोळी गीतांचे खुपच सुंदर सादरीकरण केले.मिरवणूक वाजत गाजत करंजा बंदराला किणाऱ्या वर आली.