-->
आपला महाराष्ट्र 24

कंठवली, विंधणे या आदिवासीं वाड्यांवर केलं मनसे ने रिअल फ्रेश फ्रूट ज्यूसचं वाटप.


उरण (सुनिल ठाकूर ).
    सामाजिक कार्याची आवड आणि निवड ही माणसाच्या अंगीकृत स्वभावातून निर्माण होते .आणि हे कार्य करण्याकरिता कुठलीही वेळ - काळ पहिली जात नाही तर मनातील प्रबळ इच्छाशक्तीच या अश्या क्षणांना निर्माण करते !.आणि अश्याच प्रेरणादायी क्षणांनी आज एक सामाजिक कार्य सजलं ते..महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिघोडे व श्री समर्थकृपा सखी स्वयंसहाय्यता सा.संस्था  या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून
उरण तालुक्यातील कंठवली व 
विंधणे 
 या आदिवासी वाड्यांवर ... *डाबर*  या नामांकित कंपनीच्या . रिअल फ्रेश फ्रूट ज्यूसच्या  *रिअल मँगो बॉटल्स*(  एक लिटर ), *लीची मिक्स फ्रूट ज्यूस पाकीटं*( एक लिटर) , चे वाटप करण्यात आले.
  या  आदिवासी वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना मिळालेली ही आपुलकीची भेट त्या आदिवासी बांधवांच्या आणि चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारा होता.

यावेळी विभाग अध्यक्ष संदिप ठाकूर, शाखा अध्यक्ष विनोद म्हात्रे, विलास नवाले, विंधणे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेळके,शैलेश पाटील गिरीष ठाकूर, समाधान गोंधळी, आदी पदाधिकारी सह कंठवली, विंधणे 
 आदिवासी वाड्यांवरील सर्व आदिवासी बांधव आणि महिला भगिनींच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.