उरण (सुनिल ठाकूर ). नवी मुंबई पोलीस आयुक्तालंय अंतर्गत न्हावा शेवा पोलीस ठाणे, आणि आम्ही उलवेकर मित्र मंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विध्यमाने नुकताच दिनांक 26ऑगस्ट 2023 रोजी उलवे सेक्टर 17 येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे मच्छिमार बांधव, सागर रक्षक दल, ग्राम रक्षक दल यांच्या करिता क्यू हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात नेत्र तपासणी, रक्त तपासणी, इसीजी, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, हार्ट रेट /पल्स रेट,बी एन. आय, महिलांचे आजार, पोटाचे विकार, गुडघ्याचे विकार, हाडांचे विकार, हृदय विकार, नाक, कान,घसा,गला, लहान मुलांसाठी, हार्निया, मूत्रवद्धी, पित्ताशया चे विकार, स्तनांच्या गाठी, शरीरावरील इतर गाठी आदीवर तपासणी करण्यात आल्या.
सदर कार्यक्रम प्रसंगी गव्हाण ग्रामपंचायत चे माजी उप सरपंच सचिनशेठ घरत,उपाध्यक्ष भात गिरणी तालुका पनवेल राजेंद्र घरत, न्हावा पोलीस ठाण्याचे,धनाजी क्षीरसागर, पोर्ट विभाग संजीव धुमाळ (व. पो. नि न्हावा शेवा ), दिपक इंगोले (पो. नि. गुन्हे विभाग नांव्हा शेवा ),राकेश घरत (अध्यक्ष सेक्टर 8), महिला अध्यक्षा सौ. रचना सचिन येरुणकर
उपाध्यक्ष :- सौ निशिगंधा शेलार
सचिव :- सरिता साळवे
उप सचिव :- राणी सिंग
उप खजिनदार. कीर्ती फटाक सौ. सुजाता थोरात . शीतल माने, सिद्धी पैकडे कार्तिकी कदम, सौ. अनुष्का घागरे, आम्ही उलवेकर संस्थापक सचिन राजे येरुणकर सह पदाधिकारी विनोद थोरात (अध्यक्ष ), संदीप नलावडे (सचिव ), निलेश पाटील (उपाध्यक्ष ), श्री. संदीप पाटील (खजिनदार ), रोहन खंडू (उप खजिनदार ), सुरेश फाटक, रमेश खंडू, . प्रदीप नलावडे, सावळाराम नलावडे, किशोर कदम, गणेश कदम,रवी चव्हाण, साई पैकडे, सौरभ शिंदे, प्रथमेश पाष्टे, गणेश डीचोळकर, मानव,विवेक, संकेत आदी सह उलवे वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.