उरण (सुनिल ठाकूर ).
२५ ऑगस्ट २०२३ रोजी वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स कॉलेज महालण विभाग फुंडे मध्ये प्लेसमेंट सेल व जिल्हा उद्योग केंद्र च्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय स्वयंरोजगार कौशल्यविकास व अर्थसहाय्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली . सुरुवातीला मान्यवर पाहुण्यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ आमोद ठक्कर ह्यांनी आपल्या उरणच्या परिसरातील कौशल्य आधारित शिक्षणाची गरज व त्याची आवश्यकता सांगितली तसेच उद्योजकांना असलेल्या प्रचंड संधी ह्याची सविस्तर माहिती दिली व ह्या कार्यशाळेच्या उद्देशही माहित करून दिला.
कार्यक्रमात पाहुणे म्हणुन जिल्हा उद्योग केंद्र इन्स्पेक्टर श्री मोहन पालकर ह्यांनी त्यांच्या मार्फत उद्योजकता प्रशिक्षण सुविधांची माहिती दिली तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगाला लागणारे भांडवल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मधून दिले जाणारे उत्पादन व सेवा सुविधा साठी मिळणारे कर्ज व त्याचे अनुदान त्यात महिला व श्रेणीतील व्यक्तींना विशेष अनुदानाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी विविध प्रकारचे कोर्स राबविण्यात येतात त्याची माहिती दिली हे कोर्स पूर्ण केल्यावर शासकीय सर्टिफिकेट व स्टायपेंड पण दिली जाते. तसेच कौशल्य आधारित स्वयंरोजगारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे ह्यासाठी बँक आपणास पंतप्रधान योजना व मुख्यमंत्री योजना ह्या मार्फत आपणास सबसिडी चे कर्ज अत्यल्प व्याजदराने उपलब्ध आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मान. प्राचार्य पी. जी. पवार ह्यांनी महाविद्यालयात कौशल्य विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच आपल्या परिसरातील उद्योजकांना असलेल्या प्रचंड संधी ह्याची माहिती करून दिली व यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणार्या सर्व सुविधा महाविद्यालयातर्फे उपलब्ध केल्या जातील. प्रत्यक्षात स्वयंरोजगाराच्या छोट्या मोठ्या संधी हेरून धाडस करावे लागेल. आहे त्या साधन सामुग्रीचा वापर करुन शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये प्रशिक्षण व निधि उपलब्ध करून दिला जातो त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. तसेच आपल्या परिसरात मत्स्य व्यवसाय मध्ये मत्स्य शेती, मत्स्य प्रक्रिया मध्ये विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न करावेत व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले.सदर कार्यशाळेत प्राणिशास्त्र माजी विद्यार्थी आवेश पाटील यांनी मत्स्य प्रक्रिया व निखिल तवटे आय टी माजी विद्यार्थी याने hotel व्यवसाया 🤩 श्री पालकर ह्यांचे समक्ष मार्गदर्शन घेतले.
उप-प्राचार्य डॉ विलास महाले ह्यांनी आभार प्रदर्शन केले सूत्रसंचलन डॉ. झेलम झेंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पंकज भोये , श्री भूषण ठाकूर, श्रीमती दिक्षिता म्हात्रे, श्री प्रांजल भोईर ह्यांनी विशेष परिश्रम घेतले. श्री किशोर जोशी, श्री अनिल गावंड, , श्री अरुण म्हात्रे ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.