-->
आपला महाराष्ट्र 24

पावतु सामाजिक संस्था मोरावे च्या वतीने गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप


उरण (सुनिल ठाकूर ). "एकच ध्येय फक्त सेवा " या उद्देशाने सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी मोरावे नवी मुंबई येथील "पावतु सामाजिक संस्था मोरावे." या संस्थे मार्फत कोरोना च्या काळात सुद्धा भरीव असे सामाजिक कामे केलीत. आदिवासी बांधवाना संसार उपयोगी सामान, अन्नदान अशी सामाजिक कामे करीत असताना मोरावे गावातील 99 निराधार महिलांना दरमहा 1200 रुपयांचे आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम या संस्थे मार्फत चालू आहे.
 नुकताच या संस्थे मार्फतसंस्थे चे अध्यक्ष राहुल म्हात्रे यांच्या सौभाग्यवती सौ. राधिका राहुल म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त राजिप शाळा मोरावे येथील शाळेतील विध्यार्थ्यांना साठी गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून   वाढदिवस साजरा करण्यात आला.
  सदर कार्यक्रम प्रसंगी पावतु संस्थे चे सल्लागार ऍड.संजय कानडे सर साई देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, पावतू सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहूल म्हात्रे, उपाध्यक्ष  वर्षा म्हात्रे, सचिव विनय म्हात्रे, सदस्य जनार्दन म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे,काशिनाथ म्हात्रे, शांताराम पाटील, यश म्हात्रे, नीरज म्हात्रे राधिका राहुल म्हात्रे, करिष्मा म्हात्रे, अश्विनी म्हात्रे वृषाली पाटील, शाळेचे मुख्याध्यापक दिनेश नांदगावकर, शिक्षिका वेदिका मयेकर, तन्वी त्रिलोककर,आदी सह विध्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.