उरण (सुनिल ठाकूर ).मातोश्री सुमती टिपणीस महाविद्यालय नेरळ कर्जत येथे झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या 56 युवा महोत्सवामध्ये भारतीय लोकनृत्य प्रकारात रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजे कर महाविद्यालय फुंडे उरण या महाविद्यालयाने स्पर्धेत सहभागी सर्व महाविद्यालयांना मागे टाकत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेणाऱ्या या आदिवासी लोकनृत्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रायगड झोन मध्ये लोकनृत्य मध्ये सरस ठरलेल्या महाविद्यालयाची मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.जी. पवार, नृत्य दिग्दर्शक श्री. सचिन ठाकूर आणि त्यांची संपूर्ण टीम हरीश म्हात्रे, योगेश पाटणकर, धनंजय त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुजाता पाटील व त्यांची संपूर्ण कमिटी यांचे मार्गदर्शन लाभले.
या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालय व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.