उरण (सुनिल ठाकूर ): नेरुळ मधील एकवीरा कला क्रीडा मंडळाचे हे पंधरा वे वर्ष असुन या वर्षी देखील पहिला सलामी चा मान कार्ला गडावरील आगरी- कोळ्यांची आराध्य दैवत एकवीरा आईला दिला आसे मंडळा चे अध्यक्ष देवनाथ म्हात्रे यांनी सांगितले.
दहीहंडी म्हटली की तरुणांच्या उत्साहाला उधाण येते. शहरातील, विभागातील किंवा दुसऱ्या शहरातील मनाची दहीहंडी आपणच फोडणार म्हणून या दहीहंडी उत्सवाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात. मात्र, दहीहंडी फोडण्यासाठी सराव देखील तितक्याच ताकदीचा करावा लागतो.
यंदा ७ सप्टेंबर २०२३ रोजी दहीहंडी उसव असून शहरातील बाळ गोपाळ सरावाला लागले आहेत. नेरुळ मधील एकवीरा कला क्रीडा मंडळ देखील कोडण्यासाठी सरावाला लागले असून दरवर्षी सदर मंडळ कार्ला गडावरील आगरी- कोळ्यांची आराध्य दैवत एकवीरा आईला पहिली सलामी देतात. मागील १५ वर्षापासून सदर मंडळाच्या अशी सलामी देत असून यंदा देखील २० ऑगस्ट रोजी मानवी थर रचून एकवीरा आईला सलामी देण्यात आली.