उरण (सुनिल ठाकूर ).
नेचर फ्रेंड सोसायटी (NFS)पनवेल, पनवेल नवी मुंबई मध्ये 2016 पासून कार्यरत असणाऱ्या या संस्थेचे शेकडो सभासद असून आतापर्यंत 2000 हून अधिक साप वन्यजीव वाचवले असून याचबरोबर निसर्गाचे संगोपन करण्याचे काम करत आहेत.या नेचर फ्रेंड सोसायटी(NFS) पनवेल मार्फत नागपंचमीचे औचित्य साधून नवनाथ सभागृह श्री गणेश मंदिर काळुंद्रे येथे नागपंचमीच्या पूर्व संधेला रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सर्पमित्र पुरस्कार 2023 आणि पनवेल तालुक्यातील सर्पमित्रांना सन्मानित करण्यात आले.सर्पमित्र पुरस्कार २०२३ याचे मानकरी सर्पमित्र श्री.जयवंत रामदास ठाकूर चिरनेर उरण तसेच उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार श्री. विग्घेश पाटील रा. पळस्पे यांना मान्यवरांच्या शुभहस्ते मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवित्यात आले.
तसेच संस्थेचे स्वयंसेवक यांना ही स्नमानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन नेचर फ्रेंड सोसायटी (NFS) पनवेल चे अध्यक्ष संतोष दिनकर उदरे यांच्या टीमने केले होते.
उल्हास ठाकूर (माजी मानद वन्यजीव संरक्षक रायगड)
प्रसाद दाभोळकर (सेवा संकल्प संघटना अध्यक्ष)
कुणाल शाळूंके (आवूल्स अध्यक्ष)
निखिल भोपळे ( जी डबल्यू टी विस्वत ), निसर्गमित्र पनवेलचे संस्थापक श्री.धनंजय मदन, अ.नि.स. चे श्री. मनोहर तांडेल, सुप्रसिद्ध गायक श्री. मयुर नाईक आदी सह अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
लोकांच्या घरात साप आला की लोक सर्पमित्रांना फोन करुन बोलवतात आणि सर्पमित्र ही वेळेची पर्वा न करता तो साप पकडून निसर्गात सोडून देण्यासाठी आणि जांच्या घरात साप आलेला असतो त्याच्या सुरक्षेंसाठी दिवस रात्र, थंडी पाऊस, कधी कधी तर अन्नाच्या भरल्या ताटावरून ही उठून जातात. येवडेच नाही तर वन्यजीवाविषयी प्रभोधन ही करतात. ही सर्व सेवा कोणत्याही सन्मानासाठी आणि मानधनासाठी न करता निस्वार्थीपणे सेवा करतात.
अश्या सर्व सर्पमित्रांचे कौतुक आणि त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली पाहिजे.
खरे हे सन्मान शासनाने, ग्रामपंचायतीने आणि वनविभागाने केले पाहिजे. असे मनोगत करताना संस्थेचे अध्यक्ष संतोष उदरे यांनी बोलताना केले.