दिनांक 13 जुलै 2023 रोजी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल च्या विद्यमाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस च्या वतीने महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी सेमिनार व नोकर भरतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्लेसमेंट सेलचे चेअरमन डॉ. आमोद ठक्कर यांनी केले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस च्या कॅम्पस लीड उत्तरा नायर यांनी उपस्थित सर्व इच्छुक उमेदवारांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ह्या बलाढ्य मल्टीनॅशनल कंपनीत अनेक क्षेत्रात नोकरी करण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता म्हणजेच पदवी, इच्छाशक्ती ,प्रामाणिकपणा तसेच आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देणे म्हणजे संभाषण शास्त्र इतकं जमल्यास प्रचंड वाव आहे व त्यासाठी आपणास संधी मीळावी म्हणून आजचा ड्रायव्ह आहे असे सांगितले. टीसीएस मधील अनेक विभागात जिथे अगदी फ्रेशर ने सुरुवात करून मोठ्या पदावर जाऊ शकता असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले .
माननीय प्राचार्य डॉ.पी जी पवार यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती करून दिली व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ह्या कनामांकीत कंपनी च्या टीमने इथून पुढे असेच सहकार्य
ह्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन रेश्मा बचवानी कॅम्पस रीकृटर टीसीएस , ह्यांनी केले तसेच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्या. या उपक्रमात सुमारे 82 इच्छुक उमेदवार उपस्थित होते. प्रत्यक्ष मुलाखतीतून त्यांचे कल व आवड लक्षात घेऊन व त्यांचे शैक्षणिक गुणवत्ताही लक्षात घेऊन प्रत्यक्षात 38 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा पूर्वी चौहान टॅलेंट एक्विझीशन ग्रूप टीसीएस यांनी घेतली या परीक्षेतून निवड झालेल्या 25 योग्य उमेदवारांच्या वैभवी बालया व अमीता शेट्टी एच आर टीसीएस ह्यानी 11 उमेदवारांची निवड केली. ह्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी झाल्यावर त्यांना प्रत्यक्ष नेमणूक देण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
या कार्यक्रमासाठी मुलाखती व लेखी परीक्षेचे नियोजन श्री पंकज भोये व प्रा.भूषण ठाकूर यांनी केले.