-->
आपला महाराष्ट्र 24

माजी आमदार,शेकाप नेते विवेक पाटील यांचा शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा : राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय

उरण (सुनिल ठाकूर ).
शेतकरी कामगार पक्षाचे नेते,माजी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या तब्येतीचे कारण देत शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा दिला आहे. सक्रिय राजकारणातून निवृत्ती होत असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवले आहे.
तळोजा मध्यवर्ती कारागृहातून निवृत्ती घेण्यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी,मी शेका पक्षाचा 1979 पासून सक्रिय कार्यकर्ता आहे.पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन मला दोन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून दिले. गेली दहा वर्ष पनवेल पंचायत समितीचा सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. सन 1995, 1999, 2004, 2009 अशी चार वेळा विधानसभा निवडून देऊन 20 वर्षे आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली,त्यासर्व कार्यकर्त्यांचे हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले आहेत.
तुम्हाला माहीतच आहे गेल्या 4 वर्षांपूर्वी एका जीव घेणे आजारातून मी बरा झालो.आता पुन्हा त्याच आजाराने त्रस्त आहे. शारीरिक व्याधीमुळे मला यापुढे काम करणे शक्य होणार नाही, म्हणून मी राजकारणातून निवृत्ती तसेच शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा देत आहे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.