उरण (सुनिल ठाकूर ).
पाच वर्षे अन्याया विरोधात लढणाऱ्या सहायक शिक्षिका सौ. अनुया अशोक चव्हाण यांच्या लढ्याला यश प्राप्त झाले. एप्रिल २०१७ पासून आज पर्यंत सामान्य शिक्षिकेला लढावे लागले.
शाळा न्याय्य प्राधिकरण, पुणे यांनी दि. १२ एप्रिल २०२२ रोजी न्याय दिला परंतू १५ महिने सातत्याने पाठपुरावा करूनही न्यायालयान आदेश शाळे कडून, संस्थे कडून आणि जिल्हा शिक्षण प्राथमिक विभागाकडून पाळले जात नव्हते . न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी केली जात नव्हती.या दरम्यान अनेक स्थित्यंतरे घडली विविध प्रकारे पत्रव्यवहार झाला तरीही न्याय मिळत नाही.हे पाहून प्रचंड मानसिक ताण येत होता. एकीकडे मुलांचे उच्च शिक्षण कसे करावे एकीकडे हा नोकरीमध्ये न्याय मिळूनही प्रश्न अनुत्तरित राहतो आहे.या सर्व परिस्थितीत फक्त आमरण उपोषण हा पर्याय समोर आला आणि खरोखर आज या आमरण उपोषणाला योग्य प्रतिसाद सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि पोलिस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे यांच्या योग्य भूमिके मुळे या प्रकरणातील मेरीट पाहून १५ महिन्यांपासून प्रलंबित न्याय प्रस्थापित झाला.पाच वर्ष हा लढा सुरू होता आणि पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांच्या मार्गदरशनाखाली हा लढा लढला गेला आणि यशस्वी केला. या संपूर्ण आंदोलना मध्ये अनुसया चव्हाण यांच्या पाठीशी त्यांचे पती अशोक चव्हाण, ताई शकुंतला पाटील, रवी पाटील, कामगार नेते संतोष पवार, अशोकची ताई वैशाली लाड आणि विनोद लाड यांचे फार मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. प्रा राजेंद्र मढवी सर यांनी माझे मनोधैर्य उंचावले.