-->
आपला महाराष्ट्र 24

प्रवासाचा आनंद घेत पैसा वसूल करण्याकडे भारतीयांचा कल. स्कायस्कॅनर अहवालाचे निरीक्षण• नियोजनावर भारतीयांचा मोठा रोख, ७२ टक्के


मुंबई , 12 July 2023 — स्कायस्कॅनर या जागतिक प्रवासी बाजारपेठेने आज आपला ट्रॅव्हल इन फोकस अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात हे सामायिक केले आहे की भारतातील बजेट-सजग प्रवासी अधिक परवडणाऱ्या गेटवेसाठी मोकळ्या मनाने प्रवास स्वीकारत आहेत. स्कायस्कॅनरच्या मालकीचा शोध आणि बुकिंग डेटा आणि ग्राहक वर्तणूक अभ्यासाच्या अंतर्दृष्टीसह, हा अहवाल भारतातील प्रवासीयांचे  प्राधान्य आणि अपेक्षा स्पष्ट करतो.

ह्या अहवालाच्या निष्कर्षाप्रमाणे , 47% भारतीय मंडळी जाणकार प्रवासी आहेत आणि किफायतशीर सौदा मिळाला, तर ते  त्यांच्या आखलेल्या योजना बदलण्यास देखील तयार असतात.. जेव्हा आंतरराष्ट्रीय सुट्ट्यांचा विचार केला जातो, तेव्हा  (35%) भारतीय लोक किंवा वर्षाच्या वेगळ्या वेळी (33%) प्रवास करण्यासाठी कमी खर्चिक असलेले पर्यटन स्थळे  निवडण्यास तयार असतात. भारतीय प्रवासी हे खरे तर मोठे नियोजक असूनही, 72% उत्तरदाते त्यांच्या सहलींचे पूर्ण नियोजन करण्यास प्राधान्य देतात –यावरून लक्षात येते की भारतीय प्रवासी प्रवासाचा आनंद आणि मूल्य वसूल करणे, ह्या दोन्ही बाबींचा विचार करतात.
या निष्कर्षांवर भाष्य करताना, मोहित जोशी, स्कायस्कॅनर ट्रॅव्हल ट्रेंड्स आणि डेस्टिनेशन एक्सपर्ट म्हणाले, “गेल्या काही वर्षांत करण्याची पद्धत जरी बदलली असली तरीही, लोकांमध्ये 'गेट अवे ' ची  इच्छा अजूनही खूप आहे. स्कायस्कॅनर प्रवाशांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील क्रॉस-मार्केट तुलना आणि किमतींच्या पारदर्शकतेसह त्यांच्या बजेटमध्ये जग एक्सप्लोर करणे शक्य करते. त्या मनपसंत स्थळी  पोहोचण्याचा एक सोपा हॅक म्हणजे आमचे ‘सर्वत्र’ शोध साधन वापरणे, जिथे किमतीनुसार रँक केलेल्या प्रवाश्यांच्या स्थानावर आधारित पर्यटन स्थळांची शिफारस केली जाते. अशा प्रकारे तुम्हाला फार खर्च न करता सुद्धा फिरता येईल.”
इतर प्रमुख सर्वेक्षण निष्कर्ष:
• चेंजिंग क्रिकेट: भारतीयांच्या हृदयात क्रिकेटचे विशेष स्थान आहे. सुमारे 75% लोक म्हणतात की ते थेट क्रिकेट सामने अनुभवण्यासाठी त्यांचे प्रवास बजेट वाढवण्यास इच्छुक आहेत. आगामी 2023 क्रिकेट विश्वचषक भारतात आयोजित केल्यामुळे, या वर्षी ऑक्टोबरसाठी भारतातील यजमान शहरांपैकी एक असलेले अहमदाबाद साठी प्रवाशांच्या सर्च मध्ये 46% वाढ झाली आहे. जोरदार मागणी असूनही, Skyscanner वरील अहमदाबादहून मुंबईला जाणार्या फ्लाइट्सच्या किमती जून 2022 च्या तुलनेत जून 2023 मध्ये 36% कमी असल्याचे दिसून येते.

• स्लो ट्रॅव्हलिंग गुरुज: 2023 मध्ये, भारतीय प्रवाशांचा आरामाकडे कल जास्त दिसतो आहे. अधिक प्रवासी (46%) भरगच्च वेगवान प्रवासाच्या (40%) पेक्षा अधिक परिपूर्ण प्रवासाची निवड करतात. शक्य तितक्या ठिकाणी भेट देण्याऐवजी, प्रवासी एकाच ठिकाणी अधिक वेळ घालवू पाहत आहेत, स्थानिक संस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी वेळ देत आहेत. स्कायस्कॅनरच्या डेटानुसार, 2023 च्या रीडायरेक्ट डेटावर आधारित, 38% पेक्षा जास्त भारतीय प्रवासी सिंगल- डेस्टिनेशन सहलीवर 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ घालवतात, ज्यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थानांचा समावेश आहे, जो सिंगापूरमधील (3%) आणि दक्षिण कोरिया (8%) %) प्रवाशांच्या तुलनेत लक्षणीय आहे.
• पर्पजफुल  व्हॉएजर्स: प्रवासी आज काही लक्ष्य ठेवून प्रवास करू पाहत आहेत. त्यांना प्रवासात काही विशिष्ट गोष्टी करायच्या आणि अनुभवायच्या आहेत ज्यावर ते त्यांचे लक्ष केंद्रित करतात. निम्म्याहून अधिक भारतीय (55%) स्कूबा डायव्हिंग, गोल्फ, योगा किंवा वेलनेस रिट्रीट यासारख्या  त्यांचा आवडीच्या गोष्टी कारण्यासाठी प्रवासाच्या योजना आखत आहेत. दोनपैकी एक भारतीय पुढील 6 महिन्यांत पवित्र स्थळांना भेट देण्याचे सक्रियपणे नियोजन करत आहे.

भारतीय प्रवाश्यांनी महत्त्वाच्या म्हणून ध्वजांकित केलेल्या सर्व प्रवास प्राधान्यांसाठी, मोहितने खालील हॅकची शिफारस केली आहे ज्यामुळे त्वरीत किफायतशीर सौदा करण्यात मदत होईल
स्कायस्कॅनरस  ट्रॅव्हेल इन फोकस 2023 अहवाल वनपोल  सोबतच्या संशोधनावर आधारित आहे आणि सिंगापूर, भारत आणि दक्षिण कोरियामधील 3,000 प्रवाश्यांच्या सर्वेक्षण डेटाचे विश्लेषण करून या देशांमधील प्रवासी वर्तन, वृत्ती आणि प्रवाशांच्या प्राधान्यांबद्दल काही विशेष निष्कृष्ट सादर करते..
टीप :
स्कायस्कॅनरने केलेल्या वनपोल ह्या सर्वेक्षणामधून हा संपूर्ण डेटा घेतला आहे. ही माहिती जून 2023 मध्ये सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि भारत ह्या देशातील 3000 सहभागींशी  बोलून मिळवलेली आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.