-->
आपला महाराष्ट्र 24

"विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखणे ही महत्त्वाचे"-जे. एम. म्हात्रे




उरण (सुनिल ठाकूर ).
आज केंद्र शासनाच्या "आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत वृक्षारोपण"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी NHAI चे अधिकारी  श्री.अंशुमली श्रीवास्तव, श्री वाठोरे सर, श्री.डॉ.सुरेश कुमार, श्री.घोटकर सर, श्री भरत कुमार, पनवेलचे मा.आदर्श नगराध्यक्ष श्री.जे. एम. म्हात्रे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते. 
   यावेळी बोलताना श्रीवास्तव यांनी सांगितले की, श्री.नितीन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते विकासाची कामे करताना जेवढी वृक्षतोड केली जाते त्याच्या दुपटीने वृक्ष लागवड करून सदर रस्त्याचा प्रोजेक्ट पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांचे संगोपन करून निसर्गाचा समतोल राखावा हे उद्दिष्ट नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया ने समोर ठेवले आहे.
    यावेळी बोलताना श्री.अंशुमली श्रीवास्तव यांनी सांगितले की जे एम म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आतापर्यंत केलेल्या  रस्त्याच्या कामाची गती पाहता दिलेल्या वेळेत गुणवत्ता राखून हे काम जलद गतीने पूर्ण होईल आणि कोकणवासीयांना लवकरच चांगला रस्ता प्रवासादरम्यान अनुभवास मिळेल.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.