उरण (सुनिल ठाकूर ).
रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य विलास नारायण फडके यांच्या वाढदिवसानिमित्ताने १५ व १६ जुलै रोजी लोक उपयुक्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमात शासन आपल्या दारी ,मोफत आरोग्य शिबिर, अन्नदान ,छत्री ,शालेय वस्तू वाटप, शाळांचे नूतनीकरण , कमानीचे लोकार्पण , रस्त्यांचे काँक्रिटी करण भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमातून जनसेवा व्हावी या उद्देशाने विलास फडके मित्र परिवाराने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अनेक कार्यक्रम राबविले.
नेरे मतदार संघातील एक सामान्य कार्यकर्ता ते शेतकरी कामगार पक्षाचा नेता मेहनती, सुसंस्कृत, आश्वासन पूर्तता करणारा शांत ,संयमी, निष्ठावंत असा कार्यकर्ता पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीस या पदावर आमचा सहकारी म्हणून कार्य करत असल्याचे आम्हाला सार्थ अभिमान आहे व भविष्यातील त्याची राजकीय वाटचाल यशस्वी व्हावी अशी प्रार्थना करत जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिष्टचिंतन प्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील, नेते काशिनाथ पाटील , माजी सरपंच कांता विलास फडके ,
नेरे,चिपळे ,भोकरपाडा ,भोनशेत,विहिघर ,सुकापुर, कोप्रोली पदाधिकारी ग्रामस्थ तसेच महाविकास आघाडी नेते अनेक राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनि उपस्थिती दाखवली .
राजकीय क्षेत्रातील गुरु माजी आमदार विवेकानंद पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील,नेते काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात जे जे कार्य पक्ष संघटनेच्यावतीने जबाबदारी म्हणून दिले जातील ते सर्व कार्य निष्ठेने व यशस्वी करण्याचा आश्वासन मी या निमित्ताने देत आहे . सहकार्य रुपी मार्गदर्शन आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहावे व माझ्या हातून लोकसेवा व्हावी ही इच्छा बाळगून आपण सर्वांच्या शुभेच्छांचा मी माझ्या फडके मित्र परिवाराच्या वतीने स्वीकार करून आभार व्यक्त करतो असे विलास फडके यांनी सांगितले.