उरण (सुनिल ठाकूर ).
सायकाळी 7 च्या सुमारास भिंगार गावातील सतीश हरिभाऊ पाटील यांच्या घरच्या पत्रावर 10 फूट लांबीच बिन विषारी अजगर साप बसलेला घरातील माणसानं दिसल त्या नंतर तेथे गावातील लोक जमली साप दिसाल की त्याला मारन सोप वाटत पण तस न करता त्याला वाचवता येऊ शकत या भावनेने संदेश पाटील व माझी उपसरपंच प्रकाश पाटील यांनी गावातील सर्प मित्र अनिल वरे आणि प्रतीक शेंदरे याना कॉल करून बोलून घेतले सर्पमित्र यांनी निरीक्षण करून साप बिन विषारी अजगर आहे सांगून आपली मोहीम चालू केली साप पत्रा वर असल्यामुळे आणि त्यात पाऊस पडत असल्यामुळे त्याला पकडणं कठीण काम होत परंतु आपल्यातील कौशल्य पणाला लाऊन दोघा सर्प मित्रांनी व्यवस्थित पकडण्यात यश मिळवले त्यांच्या या कामात सतिष पाटील संदेश पाटील प्रकाश पाटील जगन पवार शंकर पाटील यांनी सहकार्य केले त्या नंतर सर्वांच्या समवेत अजगर सापाला जंगलात सोडून जीवदान दिले घरमालक आणि गावातीळ लोकांनी सर्पमित्र (माझी सरपंच) अनिल वरे आणि प्रतीक शेंदरे यांचे आभार मानले