पैसे डबल करून देतो असे सांगून पसार झालेला आरोपींविरुद्ध आज दिनांक १६ जुलै २०२३ रोजी मोठ्याप्रमाणात ज्यांचे पैसे अडकले आहेत अशांनी या दिवशी कोप्रोली नाक्यावर जमावे ,अशा प्रकारचे मेसेजने मोर्चाचे आयोजन एक व्हॉटस्अप ग्रुपवर द्वारे करण्यात आले होते.
त्यामुळेच आज कोप्रोली नाक्याला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आले असल्याने कुठल्याही प्रकारचा अनैतिक प्रकार घडूला नाही. सकाळी साधारण ७ च्या सुमारास पोलिसांकडून कोप्रोली नाक्याचा ताबा घेण्यात आला होता. यावेळी पोलिस बंदोबस्त कोप्रोली मोठ्याप्रमाणात, पिरकोन, सारडे या गावांत हि पोलिस तैनात ठेवण्यात आले होते.
उरण पोलीस ठाणे यांच्याकडून जनतेस जाहिर आवाहन करण्यात आले होते, ते पुढील प्रमाणे :-
आपणास याद्वारे सुचित करण्यात येते की, उरण पोलीस ठाणे हद्दीतील पिरकोन गावातील व्यक्तीने कमी पैशात जास्त प्रमाणात परतावा देण्याचे आमिष देवून लोकांची फसवणूक केली आहे त्यापूर्वी उरण पोलीस ठाणे हद्दीतील गावागावातील ग्रामपंचात कार्यालयात सरपंच, ग्रामस्थ व बॅनर लावून पोलीस ठाणे येथे संबंधीत व्यक्तीविरूध्द तक्रार दाखल करणेबाबत आवाहन करण्यात करण्यात आले होते. त्याबाबत एका व्यक्तीने पिरकोन गावातील व्यक्तीविरूध्द उरण पोलीस ठाणे येथे तकार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सध्या व्हॉटस्अप ग्रुपवर पिरकोन गावातील व्यक्तीकडे एजट लोकांन मार्फत ठेविदाराने गुंतवणुक केले आहे व सदर व्यक्तीने एजद यांचेकडे पैसे ठेवले असून एजेंट लोक गुंतवणुकदार यांना पैसे परत न देता, उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, सदर बाबत पिरकोन येथील आरोपी व्यक्तीने एजंट कडून १४ जुनला एजेंटकडून पैसे घेणेबाबत सांगून पुन्हा १० जुलै २०२३ तारीख गुंतवणुकदारांना दिली आहे. जर १० जुलै / २०२३ तारखेला पैसे न मिळाल्यास १६ जुलै / २०२३ रोजी मोठया संख्येने कोप्रोली नाक्यावर गुंतवणुक दारांनी उपस्थित राहून पिरकोन गावातील सर्व एजेंट यांचे राहते घरी जावून पैसे वसूल करणेवावत मेसेज मध्ये नमुद केले आहे. तसेच दिनांक ०६/०७/२०२३ रोजी मा. पोलीस आयुक्त सो, नवी मुंबई यांनी कायदा व सुव्यवस्था राखणेच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रतिबंधात्मक मनाई आदेशान्वये संपुर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात परिसरात पुर्व परवानगी शिवाय ५ अगर ५ हुन अधिक व्यक्तांचा समावेश असलेल्या जमावास बंदी व शांतता धोक्यात येईल असे कृत्य करण्यास तसेच मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमास मनाई आदेश जारी उरण पोलीस ठाणेकडून हद्दीतील ग्रामस्थांना जाहिर आवाहन करण्यात येते की, व्हॉटस्अपद्वारे प्रसारीत करण्यात येणारा मॅसेज हे लोकांना एकत्र जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा आहे. ज्या लोकांनी गुंतवणुक केली आहे, त्यांचे अगोदरच नुकसान झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीताविरूध्द गुन्हे दाखल होवू शकतात. त्यामुळे अडचणी मध्ये वाढ होणार आहे.
गुंतवणुकदारांनी एजंट लोकांनी पैसे परत दिले नाही म्हणून कायदा हातात न घेता उरण पोलीस स्टेशनला येवून संबंधीतांविरुध्द तक्रार दाखल करून न्यायीक व सनदशीर मार्गाचा अवलंब करावा. सदर आवाहनानुसार कोप्रोली नाक्यावर व इतर ठिकाणी दिनांक १६ जुलै २०२३ रोजी गैर कायदयाची मंडळी जमवू नये अन्यथा कायदेशिर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
सतिश निकम
वरिष्ठ पोलीस निरीक्ष , उरण ठाणे .