-->
आपला महाराष्ट्र 24

वीर वाजेकर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात "राजमाता जिजाऊ युवती" स्व-संरक्षण कार्यक्रमाचे उद्धघाटन संपन्न.

उरण (सुनिल ठाकूर ).
दिनांक-११ जुलै २०२३ रोजी महाविद्यालयात महाराष्ट्र शासन,व एकात्मिक बाल विकास  सेवा योजना प्रकल्प यांच्या संयुक्त विध्यमाने, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या १३५ व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून महाविद्यालयात राजमाता जिजाऊ युवती स्वः संरक्षण कार्यशाळेचे उद्धघाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रमुख अडव्होकेट सीमा बिठाणे,मुंबई हायकोर्ट व डॉ.विशाल माने(API, commissioner office,New Mumbai) यांनी आपल्या मनोगतातून सायबर गुन्हे व आजची तरुण पिढी या विषयावर चर्चा केली. सीमा बिठाणे यांनी आपल्या मनोगतातून मुलींने आपले रक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.प्राचार्य,डॉ.पी.जी. पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आजच्या युवतीने आपले स्वतःचे संरक्षण स्वतःच केले पाहिजे, तसेच राजमाता जिजाऊ युवती प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्धघाटन केले.स्नेहा चव्हाण(CDPO),कल्पना इंगळे(Protection officer) किशोर उमाटे, मनोहर पाटील तसेच तु. ह.वाजेकर ज्युनिअर कॉलेज, वृंद उपस्थित होते.डॉ.रत्नमाला जावळे,चेअरमन(women forum & women Development Committee) यांनी प्रास्ताविक केले.प्रा.योगेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले,तसेच कार्यक्रमाचे आभार सुप्रिया नवले(ग्रंथपाल)यांनी मानले.महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.