-->
आपला महाराष्ट्र 24

वीर वाजेकर महाविद्यालयात "जागतिक लोकसंख्या" दिनानिमित्त व्याख्यान.

उरण (सुनिल ठाकूर ).
११ जुलै २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना व अर्थशास्त्र विभाग आयोजित "जागतिक लोकसंख्या"दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.डॉ.ए.आर.चव्हाण,(कोकण ज्ञानपीठ,कॉलेज उरण)यांनी आपल्या भाषणातून जागतिक लोकसंख्या वाढीचे परिणाम व उपाययोजना याविषयी संवाद साधला.भारताची वाढती लोकसंख्या आणि एक समस्या असून लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आजच्या पिढीने नेमके काय करायला पाहिजे याविषयी चर्चा केली.प्राचार्य,डॉ.पी.जी. पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून लोकसंख्या वाढीविषयी अभ्यासपूर्ण मत मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा.राम गोसावी,राष्ट्रीय सेवा योजनेचे चेअरमन व अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले.प्रा.श्रीकांत 
गोतपागार यांनी सूत्रसंचालन केले,प्रा.सी.डी.धिंदळे यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.